Raghuram Rajan: 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होणार म्हणजे मूर्खपणा, रघुराम राजन असं का म्हणाले?

Raghuram Rajan: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीनंतर नवीन सरकारला सर्वात मोठे आव्हान पेलावे लागेल.
Raghuram Rajan
Raghuram Rajanesakal

Raghuram Rajan:

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीनंतर नवीन सरकारला सर्वात मोठे आव्हान पेलावे लागेल. ते म्हणजे कर्मचाऱ्यांचे शिक्षण आणि कौशल्ये सुधारणे, असे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले. ते एका मुलाखतीत बोलत होते.

रघुराम राजन म्हणाले, कौशल्ये, शिक्षणात सुधारणा केल्या नाहीत तर भारताला तरुणांचा वापर करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. भारताची सर्वात मोठी चूक प्रचारावर विश्वास करणे आहे.

भारताने आपल्या मजबूत आर्थिक प्रगतीबाबत प्रचारावर विश्वास ठेवून मोठी चूक केली आहे. कारण देशासमोर महत्त्वपूर्ण संरचनात्मक समस्या आहेत. आपली क्षमता पूर्ण करण्यासाठी ठिक करणे आवश्यक आहे, असे रघुराम राजन म्हणाले.

भारताची सर्वात मोठी चूक प्रचारावर विश्वास ठेवणे होय. आपल्याला अजून अनेक वर्ष मेहनत करावी लागेल की प्रचार वास्तविक आणि खरा असेल. प्रचार ही अशी गोष्ट आहे. जी राजकीय नेत्यांना वाटते की तुम्ही विश्वास करावा. मात्र त्यांचा प्रचाराला बळी पडले तर ही एक गंभीर चूक असेल, असे रघुराम राजन म्हणाले.

रघुराम राजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2047 पर्यंत विकसीत अर्थव्यवस्था बनवन्याचा मुद्दा फेटाळला आहे. जर आपल्या देशात मुलांना शालेय शिक्षण नसेल आणि शाळा सोडण्याचा दर अधिक असेल तर यावर बोलणे म्हणजे मूर्खपणा आहे.

Raghuram Rajan
Arvind Kejriwal: जेलमधून केजरीवालांनी दोन आदेश दिले? ईडीने दिले स्पष्टीकरण,'त्यांना सही करण्याची परवानगी...'

भारतात कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे पण त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. ही मोठी शोकांतीका आहे. भारताला प्रथम कार्यबल अधिक रोजगारक्षम बनवण्याची गरज आहे आणि दुसरे म्हणजे, त्यांच्याकडे असलेल्या कामगारांसाठी रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे.

राजन म्हणाले की, भारतीय शाळकरी मुलांची शिकण्याची क्षमता महामारीनंतर 2012 पूर्वीच्या पातळीवर घसरली आहे आणि इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांपैकी फक्त 20.5% विद्यार्थी दुसऱ्या वर्गाचा मजकूर वाचू शकतात. भारतातील साक्षरता दर देखील व्हिएतनामसारख्या इतर आशियाई समकक्षांपेक्षा कमी आहे. अशा प्रकारचे आकडे आहेत ज्यांची आम्हाला खरोखर चिंता वाटते. (Latest Marathi News)

Raghuram Rajan
Ajit Pawar on Lok Sabha Seat: आम्ही भरपूर जागा मागितल्या पण.. अजित पवारांनी सांगितलं भाजपसमोर पडती बाजू घेण्याचं कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com