IPO News Update sakal
Share Market

IPO News Update : ‘पीएनजी ज्वेलर्स’चा ‘आयपीओ’साठी अर्ज

महाराष्ट्रातल्या नामांकित ज्वेलर्समध्ये दुसरा क्रमांक असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे आयपीओसाठी ‘सेबी’कडे ‘डीआरएचपी’ सादर करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रातल्या नामांकित ज्वेलर्समध्ये दुसरा क्रमांक असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे आयपीओसाठी ‘सेबी’कडे ‘डीआरएचपी’ सादर करण्यात आला आहे. ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे दहा रुपये दर्शनी मूल्याचे अकराशे कोटी रुपयांचे शेअर विक्रीला आणले जातील.

यातील रकमेतून राज्यात १२ नवी दालने उघडली जातील, तर उरलेली रक्कम कंपनीची जुनी कर्जे फेडण्यासाठी; तसेच कंपनीच्या अन्य उद्दिष्टांसाठी वापरली जाईल. महाराष्ट्रात सर्वाधिक दुकाने असलेल्या बड्या आणि नव्या युगाच्या ज्वेलर्समध्ये ‘पीएनजी ज्वेलर्स’चा दुसरा क्रमांक लागतो. कंपनीची २०२१ ते २०२३ दरम्यान महसूलवाढ भारतात सर्वांत जास्त आहे.

गेल्या वर्षअखेरीस कंपनीच्या दालनांची संख्या ३३ झाली असून, त्यातील ३२ दालने महाराष्ट्रातील १८ शहरांमध्ये व गोव्यात आहेत, तर एक दुकान अमेरिकेत आहे. या दुकानांचा एकूण रिटेल एरिया ९५ हजार ८८५ चौरस फूट आहे. यातील २३ दुकाने त्यांच्या मालकीची आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT