IPO News : रेडिओवाला नेटवर्क लिमिटेडचा आयपीओ 27 मार्चपासून होणार खुला...

रेडिओ सर्व्हिस प्रोव्हायडर रेडिओवाला नेटवर्क लिमिटेडचा (Radiowalla Network) आयपीओ 27 मार्चपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. 2 एप्रिलपर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल.
IPO News
IPO Newssakal

रेडिओ सर्व्हिस प्रोव्हायडर रेडिओवाला नेटवर्क लिमिटेडचा (Radiowalla Network) आयपीओ 27 मार्चपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. 2 एप्रिलपर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल. कंपनीने यासाठी 72-76 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. इश्यूच्या माध्यमातून 14.25 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. हा एनएसइ एसएमइ आयपीओ आहे, जो पूर्णपणे फ्रेश इश्यूवर आधारित आहे. म्हणजेच ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) कोणतीही विक्री होणार नाही. आयपीओअंतर्गत 18.75 लाख फ्रेश इक्विटी शेअर जारी केले जातील.

आयपीओमध्ये, गुंतवणूकदार किमान 1600 इक्विटी शेअर्ससाठी आणि नंतर त्याच्या पटीत बोली लावू शकतात. त्यानुसार रिटेल गुंतवणूकदारांना किमान 1 लाख 21 हजार 600 रुपये गुंतवावे लागतील. सबस्क्रिप्शननंतर शेअर्सचे वाटप 3 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, ज्या गुंतवणूकदाराना आयपीओ लागणार नाही त्यांच्यासाठी परतावा प्रक्रिया 4 एप्रिलपासून सुरू होईल. कंपनीच्या शेअर्सची लिस्ट 5 एप्रिलला होऊ शकते असा अंदाज आहे.

कंपनी आयपीओमधून मिळणारे उत्पन्न तंत्रज्ञान आणि भांडवली खर्चासाठी वापरेल. त्याच वेळी, हा फंड वर्किंग कॅपिटलसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठीही वापरला जाईल. अनिल श्रीवत्स, गुरनीत कौर भाटिया आणि हरविंदरजीत सिंग भाटिया हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत. नारनोलिया फायनान्शियल सर्व्हिसेज लिमिटेड हे रेडिओवाला आयपीओचे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर मशिताला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड हे आयपीओ रजिस्ट्रार आहेत. आयपीओमध्ये, रेडिओवाला नेटवर्कने 50% पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB), 35% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15% गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) राखीव ठेवले आहेत.

IPO News
IPO News Update : भारती हेक्साकॉमचा आयपीओ येणार, सेबीची मंजुरी...

रेडिओवाला नेटवर्क लिमिटेड ही सब्सक्रिप्शन मॉडेलवर आधारित एक इन-स्टोअर रेडिओ सेवा प्रोवायडर आहे, ज्यात ब्रँडसाठी एक विशेष रेडिओ चॅनल समाविष्ट आहे. हे कॉर्पोरेट रेडिओ सर्व्हिसेस, ऍडव्हर्टाइजमेंट सर्व्हिसेस आणि कंटेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेसही प्रदान करते. हे बी2बी (B2B) मॉडेल अंतर्गत इतर व्यवसायांना थेट सेवा प्रदान करते.

रेडिओवाला नेटवर्कने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 1.02 कोटी निव्वळ नफा आणि 14.02 कोटी महसूल नोंदवला. ऑक्टोबर 2023 मध्ये संपलेल्या कालावधीसाठी कंपनीचा निव्वळ नफा 1.14 कोटी आणि महसूल 8.72 कोटी होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com