Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today pharma outperforms 22 November 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: निफ्टीने केला 19,800चा टप्पा पार; शेअर बाजार आज दिवसभर तेजीत

Share Market Closing: सेन्सेक्स सुमारे 93 अंकांच्या वाढीसह 66,023.24 अंकांवर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 22 November 2023:

देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी किंचित वाढ झाली. व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स सुमारे 93 अंकांच्या वाढीसह 66,023.24 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 30 अंकांच्या किंचित वाढीसह 19,812 अंकांच्या जवळ राहिला.

शेअर बाजारातील महत्त्वाच्या घडामोडी:

  • तेजीनंतर मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये घसरण

  • आरबीआय गव्हर्नर यांच्या वक्तव्यानंतर बँक आणि एनबीएफसी शेअर्समध्ये घसरण

  • रेल्वे, मिडकॅप आयटी, पेपर, रिअल इस्टेट, हॉटेल, संरक्षण शेअर्सवर दबाव

  • बांगलादेशातील कर्मचाऱ्यांच्या समस्येमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात तेजी

बुधवारी शेअर बाजारात आयटी शेअर्समध्ये वाढ झाली आणि इन्फोसिसचे शेअर्स 1.31 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. बुधवारी अॅक्सिस बँक, मुथूट फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्सच्या शेअर्सनीही किंचित वाढ नोंदवली, तर आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, एसबीआय कार्ड, फेडरल बँक, आयआरसीटीसी, पतंजली फूड्स आणि आशानिषा इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

बँकिंग शेअर्सवर दबाव

आज बँकिंग शेअर्सवर दबाव कायम राहिला. इंडसइंड बँकेचा शेअर सर्वात जास्त घसरला, कोटक बँकेच्या शेअरला 1 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. एचडीएफसी बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक या बँकिंग शेअर्समध्येही घसरण झाली.

गुंतवणूकदारांचे 24,000 कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 22 नोव्हेंबर रोजी 327.89 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच मंगळवार 21 नोव्हेंबर रोजी 328.13 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 24,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 24,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT