Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात, सेन्सेक्समध्ये 260 अंकांची वाढ, रियल्टी शेअर्समध्ये...

बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत.

राहुल शेळके

Share Market Opening 13 June 2023: मंगळवारी शेअर बाजार तेजीसह उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स 260 अंकांच्या तेजीसह 63000 च्या जवळ व्यवहार करत आहे. निफ्टीनेही 70 अंकांची तेजी घेत 18,700 च्या जवळ पोहोचला आहे.

आयटी, मेटल आणि रियल्टी शेअर्स बाजारात आघाडीवर आहेत. आयटीसी, बीपीसीएल हे निफ्टीमध्ये आघाडीवर आहेत. तर L&T सर्वाधिक तोट्यात आहे.

Share Market Opening 13 June 2023

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

सेन्सेक्समध्ये एशियन पेंट्स सर्वाधिक 1.04 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे ITC 0.88 टक्क्यांनी, नेस्ले इंडिया 0.87 टक्क्यांनी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड 0.85 टक्क्यांनी वाढले.

त्याचप्रमाणे इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, विप्रो, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, पॉवरग्रीड, एनटीपीसी, एसबीआय, सन फार्मा, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटाचे टीसीएस मोटर्स, टेक महिंद्रा आणि मारुती शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. केवळ 2 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत, ज्यात कोटक महिंद्रा बँक आणि एचसीएल टेकच्या नावांचा समावेश आहे. 50 निफ्टी शेअर्सपैकी 43 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत आणि 7 शेअर्स घसरण नोंदवत आहेत.

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 33 अंकांच्या किंवा 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 18,731.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT