Stock Market Holiday Sakal
Share Market

Stock Market Holiday: ख्रिसमसनिमित्त आज शेअर बाजार बंद राहणार; सराफा बाजारातही होणार नाहीत व्यवहार

Stock Market Christmas Holiday: ख्रिसमसच्या निमित्ताने आज 25 डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

राहुल शेळके

Stock Market Christmas Holiday: ख्रिसमसच्या निमित्ताने आज 25 डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

इक्विटीसोबतच इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह आणि करन्सी डेरिव्हेटिव्हचे बाजारही बंद राहतील. शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी बाजार सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 241.86 अंकांनी किंवा 0.34 टक्क्यांनी वाढून 71,106.96 वर आणि निफ्टी 94.40 अंकांनी किंवा 0.44 टक्क्यांनी वाढून 21,349.40 वर बंद झाला सप्ताहादरम्यान बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी-50 मध्ये 0.5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

शुक्रवारी गुंतवणूकदारांनी 2.44 लाख कोटी कमावले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 21 डिसेंबर रोजी 356.53 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे गुरुवारी 21 डिसेंबर रोजी 354.09 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 2.44 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.44 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

या वर्षी बाजार कसा होता?

देशांतर्गत बाजारासाठी 2023 हे वर्ष चांगले ठरले आहे. या वर्षात आतापर्यंत सेन्सेक्स सुमारे 8 टक्के वाढला आहे, तर निफ्टी सुमारे 9 टक्के वाढला आहे. वर्षभरात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोघांनी सातत्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT