Paytm Layoffs: पेटीएमचा मोठा निर्णय! 1,000हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, काय आहे कारण?

Paytm Layoffs: पेटीएमने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमने एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.
Paytm lays off over 1000 employees as cost-cutting measure, more job cuts likely
Paytm lays off over 1000 employees as cost-cutting measure, more job cuts likely Sakal

Paytm Layoffs: पेटीएमने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमने एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. अहवालानुसार, Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ने यावेळी 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.

गेल्या काही महिन्यांत ही कर्मचारी कपात झाली आहे आणि पेटीएमच्या विविध युनिट्समधील कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे. पेटीएमने खर्च कमी करण्यासाठी आणि आपल्या विविध व्यवसायांची पुनर्रचना करण्यासाठी ही कर्मचारी कपात केली आहे. असे वृत्त इकनॉमिक टाइम्सने दिले आहे.

Paytm lays off over 1000 employees as cost-cutting measure, more job cuts likely
SEBI: शेअर्स विकल्यानंतर खात्यात लगेच पैसे येणार! गुंतवणूकदारांच्या हितासाठी सेबीचा महत्त्वाचा प्रस्ताव

पेटीएमच्या या कपातीमुळे त्यांच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे 10 टक्के कर्मचारी प्रभावित झाले आहेत. कोणत्याही भारतीय स्टार्टअपमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात मानली जाते. 2023 हे स्टार्टअप कंपन्यांसाठी चांगले वर्ष ठरले नाही.

या वर्षी, भारतीय स्टार्टअप्सनी पहिल्या तीन महिन्यांमध्ये 28 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. याआधी 2022 मध्ये स्टार्टअप कंपन्यांनी 20 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले होते आणि 2021 मध्ये 4 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते.

Paytm lays off over 1000 employees as cost-cutting measure, more job cuts likely
IMF: मोदी सरकारने IMFचा इशारा फेटाळला; अर्थ मंत्रालय म्हणाले; ''कर्ज अजूनही 2002च्या...''

‘Buy Now Pay Later’ ही सेवा बंद केल्यामुळे आणि लहान आकाराचे कर्ज देण्याच्या व्यवसायातून बाहेर पडल्यामुळे पेटीएमने ही कर्मचारी कपात केल्याचे मानले जात आहे. अलीकडेच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने देशातील वाढती असुरक्षित कर्जे कमी करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

यानंतर बँकांकडून क्रेडिट कार्ड जारी करणे, वैयक्तिक कर्ज वितरण आणि बहुतेक इलेक्ट्रॉनिक्स खरेदीसाठी वापरल्या जाणार्‍या 'बाय नाऊ पे लेटर' सेवेवर परिणाम झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com