Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग :  ढाई किलो का हाथ!

ब्रिटिश नंदी

बेटा : (अत्यंत वीरश्रीने एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक!
मम्मामॅडम : (प्रेमभराने) वेलकम डिअर बॉय! कसा झाला तुझा साऊथचा दौरा?
बेटा : (भरदार खांदे उडवत ) नेहमीप्रमाणे सक्‍सेसफुल! तमिळनाडू आणि केरळातले लोक जाम खुश आहेत माझ्यावर! (किंचित विव्हळत) आईग्गं!!
मम्मामॅडम : (काळजीच्या सुरात) काय झालं? काय झालं? यापुढे कुठ्ठेही दौऱ्यावर जायचं नाही! तुला सोडणारच नाही मुळी!
बेटा : (चकित होत) कमॉन! आज सकाळी थोड्या दंडबैठका जास्त मारल्या, एवढंच! बाकी काही झालेलं नाही मला! व्यायामाचं शरीर आहे हे! पोलादी!! 
मम्मामॅडम : (कृतक रागानं) हे असले अघोरी व्यायाम आपण करू नयेत! आत्तापर्यंत जगात एकही व्यायामपटू बलाढ्य नेता झालेला नाही, हे लक्षात ठेव! राजकारणात माणसानं कसं नेमस्त राहून राजकीय वजन वाढवायला हवं! 
बेटा : (व्यायामाच्याच मूडमध्ये...) पुढच्या दौऱ्यात दोरीवरच्या उड्यांचं चॅलेंज देणार आहे!
मम्मामॅडम : (खचलेल्या आवाजात) काय?
बेटा : (उडी मारून दाखवत) उड्या! आय मीन जागच्या जागी उड्या!! 
मम्मामॅडम : (जाब विचारत)... समुद्रात का उडी मारलीस ते सांग आधी! असले प्रकार करू नकोस, म्हणून हज्जारदा बजावलं होतं तुला! 
बेटा : (दिलखुलास हसत ) हात्तिच्या! त्यादिवशी केवढी धम्माल आली म्हणून सांगू मम्मा! माझे सिक्‍स पॅक्‍स बघून त्या कमळवाल्यांची दातखीळ बसली असेल! नुसत्या टीशर्टवरचे माझे फोटो बघून सलमान खान शूटिंग सोडून पनवेलच्या फार्महौसवर फुलटाइम शेती करायला गेल्याची अफवा आहे!! हाहाहा!! 
मम्मामॅडम : तुझ्या त्या सुप्रसिद्ध समुद्रउडीची दृश्‍यं टीव्हीवर पाहिली आणि ‘सागरा, प्राण तळमळला’ अशी माझ्या मनाची अवस्था झाली! 
बेटा : (आणखी फुशारक्‍या मारत) हे तर काहीच नाही! तमिळनाडूतल्या कुठल्यातरी गावात शाळेतल्या मुलांना मी एकहाती पुशप्स मारून दाखवल्या! तिथल्या पोरांनी मला विचारलं, की ‘च्यालेंज लेंगे क्‍या? दस पुशप मारके दिखाव!’ मी मग कशाला सोडतोय? मी पंधरा जोर काढून दाखवले! पब्लिक च्याटंच्याट!! 
मम्मामॅडम : (साधेभोळेपणानं) अंग आंबलं असेल नं? तेल लावून देते..!!
बेटा : (दुर्लक्ष करत) माझे सिक्‍स पॅक्‍स आणि पुशप्स बघून त्या कमळ गॅंगची तंतरली असणार! (तुच्छतेने) लेकाचे योगासनं करतात, योगासनं!
मम्मामॅडम : (हतबलतेनं) तू इथे समुद्रात उडी घे, जोर काढ, असले उद्योग करतोयस आणि तिथे प्रियंकादीदी आसामात चहाच्या मळ्यात पानं वेचतेय! 
बेटा : (कपाळाला आठ्या..) कसली पानं?
मम्मामॅडम : अर्थात चहाची! चहाच्या मळ्यात कुणी आपट्याची पानं गोळा करायला जाईल का?
बेटा : (बेफिकिरीनं) ‘मेरा हाथ ढाई किलो का है’ हा मेसेज मी लोकांना दिला आहे!  (भाषण दिल्यागत) ‘देखो भय्या! ये फर्क है उनके हाथ में और हमारे हाथ में! उनके हाथ में बेडकुळी नही, झुरळ है, हमारेही हाथ में बेटकुळी है...’ हाहा !! दक्षिणेतल्या लोकांना, त्यांचं भविष्य माझ्या हातात सुखरूप आहे, असंच वाटलं असणार! हो की नाही मम्मा?
मम्मामॅडम : (बळेबळेच...) हो...हो तर!  
बेटा : (दंडातली बेटकुळी दाखवत) मम्मा, आयडिया! आपण यापुढे नुसता हाताचा पंजा हे चिन्ह वापरण्यापेक्षा फुल्ल बेटकुळीवाल्या हाताचं चिन्ह वापरलं तर? मजा आएगा! 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT