Jawali Taluka
Jawali Taluka esakal
सातारा

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून शाळकरी मुलांकडून बलात्कार

महेश बारटक्के

कुडाळ (सातारा) : जावळी तालुक्यातील (Jawali Taluka) इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकत असलेल्या (14 वर्षीय) अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून तिच्याच वर्गातल्या मुलांनी वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोन अल्पवयीन मुलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही मुलगी गर्भवती असल्याचीही खळबळजनक माहिती समोर आली आहे. याबाबत मेढा पोलिस स्थानकात (Medha Police Station) पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली असून, दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलांना बालसुधारगृह तथा रिमांड होम, सातारा (Remand Home Satara) येथे दाखल करण्यात आले आहे. (Abashament On Minor Girl In Jawali Taluka Satara Crime News)

जावळी तालुक्यातील इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकत असलेल्या (14 वर्षीय) अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून तिच्याच वर्गातल्या मुलांनी वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळी तालुक्यातील (14 वर्षीय) अल्पवयीन मुलगी शेतात तिच्या कुटुंबीयांसह राहत होती. तिच्याच वर्गात शिकत असलेली दोन मुले शेतातल्या अल्पवयीन मुलीच्या घरी आले. घरात कोणी नसताना चाकूचा धाक दाखवत तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. याचे मोबाईलवर चित्रीकरण देखील करण्यात आले. मोबाईलवर (Mobile) केलेल्या चित्रीकरणाच्या आधारे व शेतातल्या घरात कोणीही नसताना याचा फायदा घेत एक महिना सातत्याने दोन्ही अल्पवयीन मुलांनी वारंवार बलात्कार केला असल्याची तक्रार देखील अल्पवयीन मुलीने आपल्या फिर्यादीत दिली आहे. यामुळे भीतीच्या छायेखाली असल्याने तिने याबाबत कुणालाही सांगितले नाही.

मात्र, यानंतर तिच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ असल्याची खळबळजनक माहिती समोर आली. याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर फिर्यादी व कुटुंबीयांनी पोलिसांना ही बाब निदर्शनास आणली. त्यानंतर तिच्याच वर्गात शिकत असणाऱ्या दोन मुलांच्या विरोधात सर्व हाकिकत पीडितांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता, संबंधित दोघांना तत्काळ ताब्यात घेऊन त्याना बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात मेढा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने (Police Inspector Amol Mane), सहकारी इमरान मेटकरी, पद्मश्री घोरपडे व रफिक शेख आदी करत आहेत.

Abashament On Minor Girl In Jawali Taluka Satara Crime News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT