जमिनीच्या वादातून ओंडला दोन गटांत तुंबळ हाणामारी; 31 जणांविरुध्द गुन्हा

Land Dispute Case
Land Dispute Caseesakal

कऱ्हाड (सातारा) : जमिनीच्या (Farm Land) वादातून दोन गटांत झालेल्या मारामारीतून तालुका पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या. त्यात दोन्हीकडील ३१ जणांवर तालुका पोलिसात (Karad Taluka Police) गुन्हा दाखल आहे. ओंड (ता. कऱ्हाड) येथे काल सकाळी हा प्रकार झाला. या घटनेची उशिरा गुन्हा नोंद झाला आहे. (Case Registered Against 31 People In Karad Taluka In Farm Land Dispute Case Satara Crime News)

Summary

जमिनीच्या वादातून दोन गटांत झालेल्या मारामारीतून तालुका पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

पोलिसांनी सांगितले, की बबन थोरात यांनी फिर्याद आहे, त्यात आत्या मनाबाई पाटील यांना घरच्या हिश्शातून तीन एकर शेती दिली होती. आत्याने ती जमीन तिचा नातजावई माणिक मोहिते (रा. रेठरे खुर्द) यास विकली. त्यानंतर आत्याचे निधन झाले. ती जमीन पडून आहे. १५ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास माझा भाऊ दादासाहेब थोरात यांचा फोन आला. त्याने सांगितले, की जमिनीमध्ये माणिक लालासाहेब मोहिते व त्याच्या कुटुंबातील बरेच लोक शेतात येऊन पिकांचे नुकसान करत आहेत.

Land Dispute Case
पाईपलाइनसाठी खोदलेल्या चरीत बुडून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

त्याची माहिती मिळताच बबनसह त्यांची पत्नी शोभा, बहीण सुवर्णा, लता, आशाताई असे शेतात गेले त्या वेळी तेथे माणिक मोहिते, राजवर्धन मोहिते, संदीप देसाई, अजिता मोहिते, सुशीला पाटील, रामचंद्र पाटील, गुड्डी मोहिते, वैभव चोरगे, अनिल पैलवान, संदीप परीट, ट्रॅक्टर चालक राम देसाई, गोट्या ऊर्फ तुषार यादव व अन्य चौघे जण ट्रॅक्टर व जेसीबीच्या (Tractor and JCB) साहाय्याने पिकाचे नुकसान करत होते. माणिक मोहिते यास जाब विचारायला गेले असता त्यांनी मारहाण केली. प्रियांका माणिक मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबन थोरात, सविता थोरात, सुवर्णा शेवाळे, शिवबा थोरात, लता मोरे, दादासाहेब थोरात, आशा चव्हाण, संध्या चव्हाण, प्रकाश भोसले, नाना थोरात, पंकज मोरे (सर्व रा.ओंड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Case Registered Against 31 People In Karad Taluka In Farm Land Dispute Case Satara Crime News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com