Dr. narendra_Dabholakr 
सातारा

डॉ. नरेद्र दाभोलकरांच्या नावाने अध्यासन उभारावे - जावळे

दिलीपकुमार चिचंकर

सातारा : माणसाच्या जगण्याचा आणि जीवनाचा सरनामा हा विज्ञाननिष्ठ असला पाहिजे. त्याशिवाय अनिष्ट रूढी, भाकड प्रथा, परंपरा यांच्या सांस्कृतिक व धार्मिक गुलामगिरीतून माणूस मुक्त होणार नाही, अशी उभ्या महाराष्ट्राला हाक देणारा विवेकवादी सुधारक डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या नावाने महाराष्ट्रास्तरावर एक अध्यासन केंद्र आणि सातारा शहरात पूर्णाकृती पुतळा उभा करावा, अशी आग्रही मागणी साहित्यिक अरुण जावळे यांनी केली. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यामध्ये खून झाला. त्या घटनेला नुकतीच सात वर्षे पुर्ण झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत श्री. जावळे यांनी निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. या निवेदनात अरुण जावळे यांनी असे म्हटले आहे, की डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे महाराष्ट्रात भरीव कार्य केले आहे.

बुद्धाने प्रतिपादलेले बुद्धीप्रामाण्यवाद, प्रतित्यसमुत्पाद आणि अनित्यवाद हे अजरामर सिद्धांत जनमाणसांत रुजविण्याची चळवळ त्यांनी गावागावांत राबवलीय. खर तर, डॉक्‍टरांच्या बलिदानामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे आज भोंदुगिरी आणि बुवाबाजी करणाऱ्या वृत्तींना चाफ बसला आहे. विशेषतः धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली ज्या प्रवृत्ती समस्त स्त्रियांचे मानसिक आणि शारीरिक शोषण करत होत्या, त्या प्रवृत्तीही गारद झाल्या आहेत.
 
डॉ. दाभोलकर यांचे हे कार्य म्हणजे शोषणमुक्त आणि अंधश्रद्धामुक्त महाराष्ट्राचे एक सुंदर विचारशिल्प आहे. या विचारशिल्पाचे चिरंतन स्मरण राहण्यासाठी आणि अवघी महाराष्ट्रभूमी विज्ञानिष्ठ बनविण्यासाठी डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने पुणे, मुंबई अशा ठिकाणी अध्यासन केंद्र उभारावे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT