Khambatki Ghat on Pune-Satara National Highway esakal
सातारा

पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; तीन किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा

आठवड्याच्या सुट्टीला लागूनच सोमवारी ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे अनेकजण गोवा व महाबळेश्वरकडे निघाले आहेत.

अशपाक पटेल

आठवड्याच्या सुट्टीला लागूनच सोमवारी ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे अनेकजण गोवा व महाबळेश्वरकडे निघाले आहेत.

खंडाळा : आज (शनिवार) सकाळी दहा वाजल्यापासून पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) दोन ट्रक बंद पडल्याने, तसेच वाहनांची संख्या सर्वाधिक असल्याने सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक ठप्प झालीये.

परिणामी, एक लेन घाटातील बोगदा मार्गे सोडण्यात आली आहे. आठवड्याच्या सुट्टीला लागूनच सोमवारी ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे अनेकजण गोवा व महाबळेश्वरकडे निघाले आहेत. यामुळं वाहनांची संख्या महामार्गावर सर्वाधिक आहे.

यातच घाट माथ्यावर दोन ट्रक सकाळी-सकाळीच बंद पडले, त्यामुळं घाटात हळूहळू कोंडी व्हायला लागली. दरम्यान, वाहनांच्या तीन किलोमीटर रांगा पारगाव-खंडाळा पर्यंत लागल्या. यावेळी घाट अधिक काळ जाम राहू नये, म्हणून ही वाहतूक सिंगल लेनने बोगदामार्गे वळविण्यात आली. सध्या ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे, विजय जाधव व वाहतूक पोलीस प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT