Satara News : साताऱ्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; पोलिस अधीक्षकांनी काढला महत्त्वाचा आदेश

पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी याबाबतचे लेखी आदेश काढले आहेत.
Satara Police
Satara Policeesakal
Summary

पोवई नाक्याकडून जाणाऱ्या एसटी बसना आता इन व आउट गेटसमोरून बस स्थानकाकडे जाता किंवा येता येणार नाही.

सातारा : मुख्य बस स्थानक परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत ‘सकाळ’ने उठवलेल्या आवाजाची दखल घेत शहर वाहतूक शाखेने पोवई नाका ते भूविकास बॅंक चौकादरम्यानच्या वाहतुकीत बदल केले आहेत.

त्यानुसार आता कोणत्याही वाहनांना मुख्य बस स्थानक परिसरातील इन व आउट गेटसमोरून वाहनांना वळण घेता येणार नाही. या वाहनांना भूविकास बॅंक चौकात जाऊनच वळण घेता येणार आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी याबाबतचे लेखी आदेश काढले आहेत. सोमवारपासून (२५ डिसेंबर) नियम लागू होणार आहेत.

Satara Police
'मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं असेल, तर उदयनराजेंनाच साताऱ्यातून उमेदवारी द्या'; कोणी केलीये मागणी?

‘सकाळ’ने मांडली होती परिस्थिती

मुख्य बस स्थानक परिसरात इन व आउट गेटजवळ रिक्षा व खाद्यपदार्थ तसेच फळविक्रेत्यांची गर्दी असते. या ठिकाणी पोवई नाक्याकडून किंवा भूविकास बॅंक चौकाकडून येणाऱ्या वाहनांना वळण्यासाठीही मार्ग आहे. त्यामुळे एसटी बस आत-बाहेर जात असताना या ठिकाणी वाहनांची कोंडी होत असते. त्यामुळे वाहनधारकांची अडचण होत होती. त्याचबरोबर अपघाताचा धोकाही संभवत होता.

त्याबाबत तातडीने मार्ग काढणे आवश्यक असल्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत शहर वाहतूक शाखेने या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू केल्याबाबतचे वृत्तही ‘सकाळ’ने दिले होते. त्या आराखड्यानुसार पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी आज वाहतूक बदलाबाबतचे आदेश दिले आहेत.

Satara Police
घरी निघालेल्या पालकमंत्र्यांच्या गाडीवर भिरकावली बाटली; पोवई नाक्यावर 100 पोलिस झाले गोळा, काय होतं बाटलीत?

इन व आउट गेट बंदी

पोवई नाक्याकडून जाणाऱ्या एसटी बसना आता इन व आउट गेटसमोरून बस स्थानकाकडे जाता किंवा येता येणार नाही. पोवई नाका किंवा राधिका रस्त्यावरून येणाऱ्या कोणत्याही वाहनांना इन व आउट गेटसमोरून उजवीकडे वळण घेता येणार नाही. बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या सर्व बसना उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मार्केट यार्डमधील रस्ता नो पार्किंग झोन

मार्केट यार्डमध्ये भारत गॅस एजन्सीसमोरून माजी राज्यपाल गणपतराव तपासे रस्ता ते मनाली कॉर्नरला जोडणारा रस्ता जातो. या रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहने लावली जातात. त्यामुळे या मधल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हा रस्ता नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे.

Satara Police
Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातली धोकादायक दरड हटवली, पण 'या' मार्गावर मोठी कोंडी

असे आहेत पर्यायी मार्ग

  • पोवई नाक्याकडून येणाऱ्या बस व वाहनांनी भूविकास चौकातून उजवीकडे वळायचे आहे.

  • बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसनी पोवई नाक्यावरून जुन्या आरटीओ चौकातून पुणे किंवा महाबळेश्वरकडे जायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com