Accident Varanasi Uttar Pradesh esakal
सातारा

काकड आरतीला चाललेल्या कऱ्हाडच्या बाईक रायडरला डंपरनं उडवलं; वाराणसीत रायडर जागीच ठार

गजानन सोसायटीतील तेजस पाटील हे मोटारसायकल रायडर (Bike Rider) आहेत.

सकाळ डिजिटल टीम

वाराणसीतील एका चौकात भरधाव आलेल्या डंपरने तेजस यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कऱ्हाड : येथील गजानन हौसिंग सोसायटीतील मोटारसायकल रायडरचा वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे अपघाती मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. तेजस संजय पाटील (वय ३२) असे त्यांचे नाव आहे.

येथील गजानन सोसायटीतील तेजस पाटील हे मोटारसायकल रायडर (Bike Rider) आहेत. वर्षातून एकदा मोटारसायकल प्रवासाला ते जातात. ३० नोव्हेंबरला त्यांचे मित्र वैभव गोडगे (चौंडेश्र्वरी नगर- गोवारे), अजय देशमुख (वाखाण, कऱ्हाड) व हर्षवर्धन थोरात (कार्वे) यांच्यासमवेत मोटारसायकल रायडिंगसाठी ते कऱ्हाडमधून निघाले.

सुरुवातीला उज्जैन, त्यानंतर अयोध्या येथे ते गेले. त्यानंतर त्यांनी नेपाळ (Nepal) गाठले. तेथे फिरल्यानंतर ते सिक्कीमला आले. तेथून त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. कऱ्हाडला परतत असताना ते वाराणसी येथे गेले. बुधवारी वाराणसीत फिरल्यानंतर गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास होणाऱ्या घाटावरील काकड आरतीसाठी तेजस स्वतःची मोटारसायकल घेऊन गेले. अन्य तिन्ही मित्र प्रवासाचा कंटाळा आल्याने झोपले होते.

मात्र, वाराणसीतील एका चौकात भरधाव आलेल्या डंपरने तेजस यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याबाबतची माहिती संबंधित पोलिसांनी त्यांच्या मित्रांना दिली. त्यानंतर येथे माहिती देण्यात आली. त्यांचे बंधू हर्ष‌वर्धन पाटील तातडीने वाराणसीला रवाना झाले.

काल रात्री मृतदेह घेऊन ते येथे आले. त्यानंतर रात्री उशिरा तेजस यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. दरम्यान, तेजस यांच्या मागे पत्नी, दोन मुली, आई, भाऊ, बहीण, चुलता- चुलती असा परिवार आहे. तेजस यांच्या अपघाती निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT