Cardiologist Dr. Anant Shridhar Sathe Passed Away esakal
सातारा

Dr. Anant Sathe : गोरगरीब शेतकऱ्यांचा 'देवमाणूस' हरपला! सातारकरांचे 'धन्वंतरी' डॉ. अनंत साठे यांचं निधन

साताऱ्याचे प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनंत श्रीधर साठे (वय ७४) यांचे काल (सोमवार) निधन झाले.

सकाळ डिजिटल टीम

ग्रामीण भागातील गरीब रुग्णला पैशावाचून त्यांनी कधी उपचाराविना पाठविले नाही. बरे झाल्यावर शेतकरी त्यांना पैशाऐवजी आपल्या शेतात पिकलेले धान्य आणून द्यायचे.

सातारा : साताऱ्याचे प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनंत श्रीधर साठे (वय ७४) यांचे काल (सोमवार) निधन झाले. सातारकरांना ते बाबा साठे या नावाने परिचित होते. साताऱ्याचे धन्वंतरी म्हणून त्यांची ओळख होती. प्रत्येक रुग्णाची हसतमुखपणे विचारपूस, चौकशी करणारा डॉक्टर (Dr. Anant Shridhar Sathe) अशी त्यांची ख्याती होती.

कोणतीही अनावश्यक इनव्हेस्टिगेशन नाहीत, कोणतेही अनावश्यक उपचार नाहीत अशी त्यांची रुग्णसेवेची पद्धत होती. विशेषत: ग्रामीण भागातील गरीब रुग्णला पैशावाचून त्यांनी कधी उपचाराविना पाठविले नाही. बरे झाल्यावर शेतकरी त्यांना पैशाऐवजी आपल्या शेतात पिकलेले धान्य आणून द्यायचे. त्यांनाही त्यांनी कधी नाराज केले नाही.

तत्त्वांशी कधीही बांधिलकी न सोडणारे, जाताजाता विधायक प्रेरणादायी विचार देणाऱ्या डॉ. साठे यांनी आपल्या जीवनात उपचारांबरोबर अनेकांना मानसिक आधार दिला. अनेकांना आर्थिक मदत केली. त्यामुळे जन्या पिढीतील डॉ. साठे सातारकरांना आपलेसे वाटायचे. साठे डॉक्टर माहीत नाहीत असा एकही सातारकर सापडणार नाही.

त्यांच्या निधनाने रुग्णांना आपुलकीने चौकशी करणारे, सहहृदयी, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व जुन्या पिढीतील सेवाभावी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच साताऱ्यातील सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. अनेक मान्यवरांनी निवासस्थानी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्‍‍चात पत्नी, मुलगा डॉ. अजय, मुलगी अवंती, जावई, सून डॉ. भक्ती, नातवंडे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचा दर किती?

Viral Video : आरती सुरु असतानाच पुजाऱ्याला हृदयविकाराच्या झटका, जागेवरच मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Update : जयंत पाटील वर्षावर गेले, म्हणजे राजकारणात ट्विस्ट आहे; राष्ट्रवादीच्या नेत्याचं विधान

IND vs ENG 1st ODI: अक्षर पटेलची ऐतिहासिक कामगिरी! सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, युवराज सिंगसह सहा जणांशी बरोबरी

Sangli Crocodile Attack : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! मगरीने आधी खांदा पकडला, मग मानेवर झडप; पाठीत दात घुसल्याने गंभीर जखमी, 60 वर्षीय नागरिकाची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT