Dengue Disease
Dengue Disease  esakal
सातारा

Satara : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील आरोग्य सलाईनवर

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्हाभरात डेंगी साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मात्र, या आजाराला रोखण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजना तोकड्या पडत असून मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य विभाग सलाईनवर असल्याचे दिसून येते. पावसाळा संपूनही डेंगीसदृ‍श रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना ‘ब्रेक’ लागल्याचे समोर येत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. जिल्ह्यात वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात तब्बल ३९० डेंगीचे, चिकुनगुणियाचे ३८ तर हिवतापाचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र, पावसाळा संपूणही डेंगीची लागण कमी होत नसल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. हिवताप कार्यालय व जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने दक्षता घेत घरोघरी जाऊन सर्व्हे केला होता. तसेच ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक आहे, त्या परिसरात आरोग्य विभागातर्फे तपासणी मोहीम राबवत धूर फवारण्याही केल्या होत्या. तरीदेखील डेंगी लागण झालेल्या रुग्णांची उपचारासाठी रुग्णालयांमध्ये भरती होत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालयांतही उपचारासाठी डेंगीसदृश रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, प्रत्यक्षात आरोग्य विभागाकडे असणारी डेंगीसदृ‍श रुग्णांची नोंद कमी होत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी लॅबमध्ये तपासणी करणाऱ्या रुग्णांची आकडेवारी आरोग्य विभागाला तंतोतंत मिळत नसल्याचे दिसून येत असून या प्रकारामुळे खासगी तपासणी लॅबधारकांवर आरोग्य विभागाचे नियंत्रण नसल्याचे समोर येत आहे.

डेंगीची लक्षणे...

तीव्र ताप येणे व डोके दुखणे

सांधे व अंगदुखी

डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे

रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होणे

अंगावर लालसर पुरळ येणे

उपाययोजना...

घरातली पाण्याची भांडी सतत झाकून ठेवा

झोपताना मच्छरदाणीचा वापर

खिडक्यांना जाळ्या बसविणे

घराभोवती व घरातही स्वच्छता राखणे

पूर्ण कपडे परिधान करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Durgadi Fort : शिंदे-ठाकरे गटाचे दुर्गाडी देवीच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन; किल्ल्याजवळ तणावाचं वातावरण, काय आहे कारण?

Jammu-Kashmir Encounter: सुरक्षा दल अ‍ॅक्शन मोडमध्ये! काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला केलं ठार, शोध मोहीम सुरू

Latest Marathi Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

Laxman Hake : लेखी आश्वासनाशिवाय उपचार नाही,उपोषणकर्ते ओबीसी नेते हाकेंची भूमिका;प्रकृती खालावली

Sant Nivruttinath Palkhi : निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहकुटुंब सहभागी होणार! त्र्यंबकेश्‍वराचे घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT