सातारा

कोयनावासीयांनी पाळला काळा दिवस; भूकंपाच्या आठवणी आजही ताज्या

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : काेयना  खोऱ्यात ११ डिसेंबर १९६७ ला झालेला विनाशकारी भूकंपाचा ५३ वा स्मृतीदिन कोयनावासीयांनी भूकंपात मृत झालेल्यांना श्रध्दांजली वाहत काळा दिवस म्हणून आज (शुक्रवार) पाळला.

कोयना परिसरातील असंख्य नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते. ११ डिसेंबर १९६७ ला पहाटे चार वाजून २३ मिनिटांनी ७.५ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा जोरदार धक्का कोयना परिसरात बसला होता. या भूकंपामुळे कोयना खोऱ्यात खूप माेठे संकट कोसळले होते. या भूकंपात दाेनशे पेक्षा जादा लोकांचा मृत्यू झाला. याबरेबरच दाेन हजार पेक्षा जादा लोक जखमी व जायबंदी झाले होते. या  विभागातील ४० ते ५० गावे पूर्णतः उध्वस्त व बेचिराख झाली होती. या विनाशकारी घटनेला आज (शुक्रवार) ५३ वर्ष पुर्ण झाली आहेत. आजचा हा दिवस कोयना विभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो.

पत्नीच्या खूनप्रकरणी उस्मानाबादच्या ऊसतोड मजुरास सक्तमजुरी; कऱ्हाड न्यायालयाकडून चारच दिवसांत निकाल

कोयनानगर येथील मारुती मंदीर परीसरात कोयनावासीयांनी एकत्र येवून भूकंपात मृत झालेल्या निष्पाप लोकांना श्रध्दांजली वािहली. यावेळी कोयना प्रकल्पाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव फाळके , पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार ,कोयना प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता एन. एम.मेटकरी ,पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे , शिव दौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील , शिवसेना उपजिल्हा प्रमुख रविंद्र पाटील ,नंदकुमार सुर्वे ,अभियंता संजय शेलार ,पंकज गुरव , सरपंच रमेश कदम , नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. जे. गिरीगोसावी कोयना प्रकल्पाचे अधिकारी कर्मचारी नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलचे विद्यार्थी व कोयना विभागातील जनता उपस्थित होती.

Edited By : Siddharth Latkar

कोयनेची मुख्य भूकंप वेधशाळा मार्चनंतर बंद?; पाटणच्या विनाशकारी भूकंपाला 54 वर्षे पूर्ण!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT