devendra fadnavis warn to sharad pawar over pm narendra modi statement
devendra fadnavis warn to sharad pawar over pm narendra modi statement  Sakal
सातारा

Devendra Fadnavis : नरेंद्र मोदींवरील विधानावरून शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांचा इशारा

हेमंत पवार

पाटण : सगळ भाष्य करायच अन मग म्हणायच भाष्य करणार नाही.शरद पवारांची छान पध्दत आहे. पण त्यांनी ते भाष्य कराव कारण मोदीचं जीवन खुल्या पुस्तकाप्रमाण आहे. जे मोदीवर बोलतील त्याच्यावरच त्यांचे भाष्य उलटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आज शनिवारी पाटण येथे आले होते त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शंभूराजे देसाई, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व मान्यवर उपस्थित होते. खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाविषयी मला सगळं माहित आहे. परंतु मी त्यावर भाष्य करून मी माझी पातळी सोडणार नाही असे वक्तव्य केले आहे त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,

सगळ भाष्य करायच अन मग म्हणायच भाष्य करणार नाही.शरद पवारांची छान पध्दत आहे. पण त्यांनी ते भाष्य कराव कारण मोदीचं जीवन खुल्या पुस्तकाप्रमाण आहे. जे मोदीवर बोलतील त्याच्यावरच त्यांचे भाष्य उलटल्याशिवाय राहणार नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलेल्या यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे.या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामिनी जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होत असला तरी कोरोना काळातील भ्रष्टाचाराचा बोलवता धनी कोण आहे? हे लवकरच आम्ही समोर आणणार आहोत असा इशारा यावेळी दिला.

खासदार उदयनराजे यांचा विजय निश्चित

महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाटण येथील सभेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. उदयनराजेंचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे.संपूर्ण सातारा महायुती आणि उदयनराजेंच्या पाठीशी असून साताऱ्यात 6 पैकी 4 आमदार महायुतीचे असल्याने उदयनराजेंचा विजय निश्चित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICU मध्ये आजारी वडिलांसमोर लागले दोन मुलींचे लग्न, डॉक्टर-नर्स झाले वराती, नंतर... डोळे पाणावणारी घटना

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले! केंद्रीय गृहमंऱ्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावत घेतला परिस्थितीचा आढावा

SAKAL Impact : ..अखेर वेळेपूर्वीच व्हीपीयू वॅगन फलाटावर; निंभोरा रेल्वेस्थानकावरून केळी रेक दिल्लीकडे

"महाराष्ट्रात 100 किल्ल्यांवर लँड जिहाद," भाजप आमदाराचं खळबळ उडवून देणारं वक्तव्य, विमानतळावरच पोलिसांनी घेतलं ताब्यात

Rahul Gandhi : 'ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स...'; लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी पुन्हा उपस्थित केला प्रश्न

SCROLL FOR NEXT