सातारा

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा, जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश

सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड (जि. सातारा) : माण तालुक्‍याच्या पूर्व भागात वादळी पावसाने झालेल्या पिके, फळबागा, रस्ते व पुलांचे मोठे नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. एकही शेतकरी पंचनामा व मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. 

तालुक्‍याच्या पूर्व भागाला वादळी पावसाने झोडपून काढले. अनेक भागांतील फळबागा व शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याची पाहणी नुकतीच जिल्हाधिकारी सिंह यांनी केली. या वेळी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, विभागीय कृषी अधिकारी कोळेकर, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रकांत सानप, गटविकास अधिकारी एस. बी. पाटील, सहायक गटविकास अधिकारी भारत चौगुले उपस्थित होते. 

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पांढरवाडी, बिदाल, दहिवडी, म्हसवड या गावांतील शेतकऱ्यांना भेटी देत राजेवाडी तलावाची पाहणी करून माहिती घेतली. यानंतर देवापूर येथील शेतकरी रघुनाथ बाबर यांच्या द्राक्षबागेचे अवेळी पावसामुळे दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या शेतकऱ्याच्या बागेस भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी दहिवडी परिसरातील बिदाल येथील कांदा, बटाटा, मका पिकांची पाहणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधित अधिकारी वर्गाने शासकीय मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. कोणी शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहिल्यास शेतकऱ्यांने गावच्या कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करावा, तरीही कोणीही न आल्यास प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: देश मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर... पर्यावरण बदलामुळे अर्थव्यवस्थेलाही बसणार फटका; राज ठाकरेंचा गंभीर इशारा

Gold Rate Today: सोन्यातील घसरण कायम! सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त; चांदीही घसरली, पाहा आजचे ताजे भाव

Monsoon Arrival Maharashtra : महाराष्ट्राच्या दिशेने मॉन्सूनची वाटचाल वेगवान; ७ ते ८ जूनदरम्यान आगमन, बंगालच्या उपसागरात मॉन्सून पट्टा अधिक तीव्र

Latest Marathi News Live Update : बावधनजवळ अवजड वाहन बंद पडल्याने मुंबई-बंगळूर महामार्गावर 10 किमी लांब वाहतूक कोंडी

Mumbai-Goa Highway : मंत्री गडकरींचे आश्वासन हवेत विरले? कोलेटी पुलाच्या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी; मुंबई-गोवा महामार्गाचे काम 18 वर्षांपासून सुरू!

SCROLL FOR NEXT