पीक नुकसानीच्या पाहणीसाठी गृहराज्यमंत्री थेट बांधावर!

अरुण गुरव
Saturday, 17 October 2020

मी स्वतः झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी महसूल विभागाच्या आणि कृषी विभागाचे अधिकऱ्यांबरोबर शेतावर जाऊन प्रत्यक्ष केली. पाटण तालुक्‍यामध्ये 13 महसूल मंडलांपैकी 11 महसूल मंडलांमध्ये 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 325 पेक्षा जास्त गावे या अतिवृष्टीने बाधित आहेत. हजार ते दीड हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित असण्याचा अंदाज दिसून येत असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

मोरगिरी (जि. सातारा) : अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून त्यांना निश्‍चितपणाने सर्वोतोपरी मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. 

पाटण विधानसभा मतदारसंघातील सांगवड, बेलवडे, नाडे, चोपडी गावामध्ये पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या पाहणीनंतर ते बोलत होते. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, "अतिवृष्टीने शेतात उभ्या असणाऱ्या पिकांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली खरीप हंगामातील भात, सोयाबीन पिके पावसामुळे शेतात कुजत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन खरीप पिकांच्या काढणीत जी पिके शेतकऱ्यांनी मळणीला काढून ठेवली होती. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

मेडिकल कॉलेजसाठी हालचाली गतीमान; पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

मी स्वतः झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी महसूल विभागाच्या आणि कृषी विभागाचे अधिकऱ्यांबरोबर शेतावर जाऊन प्रत्यक्ष केली. पाटण तालुक्‍यामध्ये 13 महसूल मंडलांपैकी 11 महसूल मंडलांमध्ये 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 325 पेक्षा जास्त गावे या अतिवृष्टीने बाधित आहेत. हजार ते दीड हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित असण्याचा अंदाज दिसून येत आहे.'' 

कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कावीळ, जगच दिसू लागलंय पिवळं : नगराध्यक्षांचा सडेतोड पलटवार

महसूल आणि कृषी विभाग जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणा नुकसानीचे पंचनामे करत आहेत. बुधवारपर्यंत नुकसानीमुळे किती क्षेत्र बाधित झाले आहे यांचा अंदाज येईल. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करून त्यांना निश्‍चितपणाने मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची राहील. आमचे सरकार नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे त्यांनी सांगितले.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Of State For Home Affairs Shambhuraj Desai Inspects Rain-Damaged Crops At Morgiri Satara News