सातारा

सरपंच जावयासाठी धावले माजी मंत्री सासरे!; ताेडलेला वीजपुरवठा तत्काळ जोडला गेला

संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : थकीत वीजबिलापोटी "महावितरण'ने मायणी प्रादेशिक पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईची माहिती सरपंच सचिन गुदगे यांनी त्यांचे सासरे, कॉंग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांना दिली. श्री. पाटील यांनी थेट राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर मंत्री राऊत यांनी पूर्ववत वीज जोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला.
 
सरपंच श्री. गुदगे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ""मायणी प्रादेशिक योजनेचे सुमारे सव्वातीन कोटी वीजबिल थकीत आहे. त्यापैकी दोन लाख रुपये ग्रामपंचायतीने भरलेले आहेत, तरीही "महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी पाणी योजनेची वीज खंडित केली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात तीव्र टंचाई निर्माण झाली. पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होऊ लागली. निर्माण झालेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती आपण बसवराज पाटील यांना दिली, तसेच मायणीसह पाच गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे बिल आम्ही सत्तेवर येण्याआधीपासूनचे आहे. नुकतेच दोन लाख रुपये बिल ग्रामपंचायतीने भरलेले आहेत. थकबाकीची रक्कम मोठी असल्याने ती पूर्ण भरणे अशक्‍य आहे. वीजबिल परवडत नसल्याने प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील सहभागी चितळी, मोराळे, गुंडेवाडी व मरडवाक या ग्रामपंचायती बाहेर पडलेल्या आहेत. त्यामुळे योजनेच्या पूर्ण बिलाचा बोजा एकट्या मायणी ग्रामपंचायतीवर पडतो आहे. परिणामी योजना चालवणे जिकिरीचे झाले आहे.'' 

कर्करोग, संसर्गजन्य रोगावर नॅनोकार्गो उपाय; भारतीय संशोधकाचा युरोपियन युनियन कमिशनकडून सन्मान

माजी मंत्री श्री. पाटील यांनी मायणी पाणीपुरवठा योजनेबाबत थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती देऊन चर्चा करून खंडित वीजपुरवठा तत्काळ जोडण्यासंदर्भात विनंती केली. त्यानुसार मंत्री श्री. राऊत यांनीही वीजपुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या. त्यामुळे वीज जोडण्याची कार्यवाही तातडीने होऊन पाणीपुरवठाही पूर्ववत सुरळीत झाला, असे श्री. गुदगे यांनी सांगितले. 

टंचाईने त्रस्त नागरिकांना मिळाला दिलासा 

दरम्यान, विविध भागांतील पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्याने टंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला. सरपंच असलेल्या श्री. गुदगे या जावयाच्या मदतीसाठी माजी मंत्री असलेले सासरे श्री. पाटील धावून आल्यामुळे अपेक्षेपेक्षा लवकर पाणीपुरवठा सुरळीत झाल्याची चर्चा ठिकठिकाणी होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

IND vs WI 5th T20I: पाऊस थांबला, ९ वाजता टॉस, सव्वा नऊ वाजता मॅच सुरू होणार; वाचा किती षटकांचा सामना रंगणार

Beed News : बीडमध्ये महायुतीच्या सभेत भाजपच्या दोन आमदारांची दांडी; पंकजाताईंच्या टोमण्याने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

Congress Mega Rally : अखेर दिल्ली पोलिसांची काँग्रेसला 'एनओसी'; ऐतिहासिक रामलीला मैदानावर ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, 'ही' आहे तारीख!

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : महसूलमंत्री बावनकुळे

SCROLL FOR NEXT