सातारा

पत्नीच्या खूनप्रकरणी उस्मानाबादच्या ऊसतोड मजुरास सक्तमजुरी; कऱ्हाड न्यायालयाकडून चारच दिवसांत निकाल

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : उस्मानाबाद येथून ऊसतोडीसाठी मनव (ता. कऱ्हाड) येथे आलेला मजूर लाला शहाजी डवारे याने त्याच्या पत्नीचा डोक्‍यात भरीव बांबू घालून खून केला. याप्रकरणी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाखाली गुन्हा शाबित झाल्यामुळे त्याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 

मागील वर्षीच्या ऊस गळीत हंगाम सुरू असताना एप्रिल महिन्यात लॉकडाउन जाहीर झाले. त्यामुळे सर्व जागेवरच ठप्प झाले. परिणामी, उस्मानाबाद येथून आलेली ऊसतोड मजुरांची टोळी मनव येथे थांबली. या टोळीतील मजूर लाला डवारे याची पत्नी सारिका या गावी जाण्यासाठी त्याच्यासोबत वाद घालत होत्या. एक एप्रिल रोजी रात्री या कारणावरून दोघांत भांडण झाले. या वेळी चिडलेल्या लाला डवारे याने पत्नी सारिका हिच्या डोक्‍यात भरीव बांबू घालून तिचा खून केला. याप्रकरणी मनव येथील पोलिस पाटील अनिता कृष्णत पोळ यांनी सरकारतर्फे कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली. खुनाचा तपास करून कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश कड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

विकासकामांसाठी आमदारांना मिळणार शंभर टक्के निधी

कोरोना संसर्गाची लाट कमी झाल्यानंतर न्यायालयीन कामकाज सुरू झाले. येथील जिल्हा न्यायालयात कामकाज सुरू होताच सोमवारी (ता. 7) जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ऍड. मिलिंद कुलकर्णी यांनी 12 साक्षीदार तपासले. फिर्यादी अनिता पोळ, डॉ. एस. ए. खैरमोडे, लखन सोनवणे व तपास अधिकारी श्री. कड यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. या खटल्यात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात आरोपी लाला डवारे यास दोषी धरून जिल्हा व सत्र न्या. एस. ए. ए. आर. औटी यांनी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे ऍड. कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना हवालदार सूर्यकांत खिलारे, महिला पोलिस अर्चना पाटील, टी. एस. भोसले यांनी सहकार्य केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

मच्छिंद्र कांबळी यांचं अजरामर 'वस्त्रहरण' नाटक पुन्हा भेटीला येणार; 'हा' कसलेला अभिनेता साकारणार तात्या सरपंच

Latest Marathi News Live Update : चाकण परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या बेकायदेशीर विक्रीचा भंडाफोड; २५१ सिलेंडर जप्त

SCROLL FOR NEXT