सातारा

डांगरेघर ग्रामपंचायतीवर महिलाराज; सरपंचपदी कोमल आंग्रे, उपसरपंचपदी सुमन सुर्वे

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : बिनविरोध निवडणूक झालेल्या डांगरेघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोमल आंग्रे, उपसरपंचपदी सुमन विश्वास सुर्वे यांची बिनविरोध निवड झाली. दुसऱ्या अडीच वर्षांसाठी रूपाली सुर्वे यांची निवडही यावेळी निश्‍चित करण्यात आली. या ग्रामपंचायतीवर महिलाराज आल्याचे स्पष्ट झाले. 

महाराष्ट्राचे राज्यपाल पी. सी. अलेक्‍झांडर यांनी गौरवलेले हे गाव अंतर्गत दुफळीने त्रस्त झाले होते. मात्र, आता गावातल्या धुरिणांनी गावाची निवडणूक बिनविरोध करून महिलांच्या हातात गावची सूत्रे दिली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच निवडीसाठी सदस्यांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल कृषी अधिकारी संजय घोरपडे, कृषी अधिकारी संतोष इंगवले, तलाठी संदीप ढाकणे, ग्रामसेवक विक्रम घाडगे, ग्रामपंचायत सदस्य अमोल आंग्रे, शांताराम सुर्वे आदींच्या उपस्थितीत झाली. डांगरेघरचे सरपंचपद महिला राखीव असल्याने सरपंचपदी कोमल आंग्रे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी पहिल्या अडीच वर्षांसाठी सुमन सुर्वे व पुढील अडीच वर्षांसाठी रूपाली सुर्वे यांची निवड निश्‍चित करण्यात आली.

गावात मुलगी जन्माला आली तर तिचे गावातर्फे स्वागत करणे, सुकन्या योजनेसाठी नवजात मुलीच्या नावे काही रक्कम "एफडी'मध्ये ठेवणे, महिलांना लघुउद्योग करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान, शिलाई मशिन उपलब्ध करून देणे, ग्रामसभा सक्षम व लोकाभिमुख करून लोकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविणे आदी संकल्प नूतन सरपंच आंग्रे यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी सत्काराला उत्तर देताना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील राहू आणि गावची एकता टिकवण्याची ग्वाही दिली.

वाचनप्रेमींनाे! साताऱ्यात उद्यापासून ग्रंथोत्सव; सवलतीच्या दरात नामवंत लेखकांच्या पुस्तकांचा खजाना

पवार साहेब सांगताहेत वीजबिल भरू नका, उपमुख्यमंत्र्यांची बिलासाठी शेतकऱ्यांना दटावणी : थोरात

धूम स्टाईल सोनसाखळी चोरट्यास कऱ्हाडात अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT