karad 
सातारा

कृष्णाकाठी हेवेदावे मिटले... सर्वांनी दिला हा नारा!

अमाेल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : जिल्हाधिकाऱ्यांनी यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा आदेश दिला आहे. कोरोनारूपी महामारीस रोखण्यासाठी राज्य शासनानेही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या या आदेशास आपणही सहकार्य करूया. यंदा कृष्णाकाठी हेवेदावे बाजूला ठेवून एक गाव, एक गणपती उत्सव होईल, असा एकमुखी निर्णय रेठरे बुद्रुक विभागातील सर्व गणेश मंडळांनी घेतला आहे. 

आटके टप्पा येथील विराज हॉलमध्ये रेठरे बुद्रुक पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर यांच्या अध्यक्षतेखाली रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, आटके, वाठार व मालखेड येथील सर्व गणेश मंडळांची बैठक झाली. यावेळी सर्व मंडळांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यावेळी पोलिस नाईक अमोल पवार, हवालदार श्री. जाधव तसेच सर्व गावांचे पोलिस पाटील उपस्थित होते. श्री. भापकर म्हणाले, ""आजची परिस्थिती मनाला मुरड घालण्यास शिकवणारी आहे. श्रद्धेच्या नावाखाली समाजाला त्रास का? त्यासाठी एक गाव, एक गणपती उपक्रम राबवण्यामागे पोलिस यंत्रणेचा उद्देश लक्षात घ्या. प्रत्येक कार्यात तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य राहणार आहे. घरगुती गणपती विसर्जन होणाऱ्या ठिकाणी स्वच्छता करण्यासह सुरक्षेची काळजी घ्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या अगोदर विसर्जन करण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन द्यावे.'' बापूसाहेब मोहिते यांनी आभार मानले. 

दरम्यान, यंदा उत्सवात बचत झालेला खर्च समाजोपयोगी कार्यास देण्याचे आवाहनही करण्यात आले. त्याचबरोबर रेठरे बुद्रुक दूरक्षेत्रातील शेणोली, गोंदी, जुळेवाडी व खुबी या गावांतील मंडळांनीही एक गाव, एक गणपती निर्णय घेतल्यामुळे कृष्णाकाठावर सर्वत्र गणेश उत्सव साधेपणाने होणार आहे, हे पक्के झाले. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT