bibtya(leopard)  sakal
सातारा

सातारा : तांबवेतील शिवारात बिबट्याचा मुक्काम; शेतकऱ्यांत धास्ती

वनविभागाने बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, शिवारात पिंजरा लावावा, अशी मागणी तांबवे ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली.

अनिल बाबर

तांबवे ः गावातील तीन ते चार वेगवेगळ्या ठिकाणच्या शिवारात बिबट्याचा मुक्काम असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पहाटे आणि रात्री बिबट्याचा मुक्त संचार तेथील शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे. त्याची पाहणी वन कर्मचारी यांनी केली आहे. मात्र, त्याचा बंदोबस्त तातडीने करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांतून होत आहे.

तांबवे परिसरात चार बिबट्यांचा वावर असल्याची चर्चा आहे. मागील आठवड्यात गावात येऊन त्याने कुत्रे ठार मारले होते. त्यानंतर शिवारातील तीन ठिकाणी शेतकऱ्यांना बिबट्यांचे दर्शन झाले आहे. मध्यंतरी तांबवे गावातील अप्पासाहेब पाटील हा शेतकरी सकाळी सातच्या सुमारास जनावरांच्या शेडमध्ये होता. यानंतर काही वेळाने याच शेडमध्ये जवळच बिबट्या डोकावत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांची हालचाल झाल्याचा आवाज येताच बिबट्या उसाच्या शेतात निघून गेला.

दरम्यान पाटील यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात बिबट्याच्या मुक्त संचाराचे चित्रीकरण केले होते. बिबट्यांच्या वावराने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या परिसरात शेतकऱ्यांना जाण्याचे टाळले आहे. वनविभागाने बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, शिवारात पिंजरा लावावा, अशी मागणी तांबवे ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

Pune News : झाडणकाम वाढले, रस्ते स्वच्छ, उकिरडे झाले कमी

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Rapido Crime : बेकायदा प्रवासी वाहतूकप्रकरणी ‘रॅपिडो’वर गुन्हा दाखल

Shirur Crime : न्हावरेत कार चालकाला धमकी; मारहाण करून स्विफ्टच्या काचा फोडल्या.....

SCROLL FOR NEXT