AUS vs WI: ऑस्ट्रेलियाचा दमदार विजय; आफ्रिकेच टेन्शन वाढवलं

या विजयासह ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलसाठी दावेदारी आणखी भक्कम केली आहे.
Australia VS WestIndies
Australia VS WestIndies Sakal

डेविड वॉर्नरच्या नाबाद 89 धावा आणि मिशेल मार्शलनं त्याला अर्धशतकी खेळी करत दिलेली साथ याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजला 8 विकेट्सनी पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलसाठी दावेदारी आणखी भक्कम केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेच टेन्शन वाढवलं आहे. ते साखळी फेरीतील अखेरचा सामना इंग्लंड विरुद्ध खेळणार आहेत. जर सेमीचे तिकीट पक्के करायचे असेल तर त्यांना इंग्लंड विरुद्ध मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहे.

Australia VS WestIndies
चॅम्पियन ब्रावोसह युनिव्हर्सल बॉसचाही अखेरचा सामना?

ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हेजलवूडने घेतलेल्या 4 विकेट आणि स्टार्क, कमिन्स आणि झम्पाने घेतलेली प्रत्येक एक एक विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजला निर्धारित 20 षटकात 7 बाद 157 धावांवर रोखले होते. ख्रिस गेल 9 चेंडूत 15 धावांची खेळी करुन बाद झाला. लुईसने 29 धावांची खेळी केली. पूरन 4 आणि रोस्टन चेस खातेही न उघडता माघारी फिरला. हेटमायरने 27 धावांची खेळी केली. कर्णधार पोलार्डने केलेल्या 44 धावांच्या खेळीमुळे वेस्ट इंडीज संघाला धावफलकावर 157 धावा लावता आल्या.

Australia VS WestIndies
T20 WC : TikTok हिरोची टकाटक फिफ्टी!

विंडीजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार फिंच स्वस्तात माघारी परतला. त्याने अवघ्या 9 धावांची भर घातली. त्यानंतर वॉर्नर आणि मिशेल मार्शने 124 धावांची भक्कम भागीदारी रचली. विजयासाठी अवघी एक धाव कमी असताना मिशेल मार्श बाद झाला. त्याने 32 चेंडूत 5 चौकार 2 षटकाराच्या मदतीने 53 धावा केल्या. वॉर्नर 89 धावांवर नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार खेचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com