सातारा

कोयनेची मुख्य भूकंप वेधशाळा मार्चनंतर बंद?; पाटणच्या विनाशकारी भूकंपाला 54 वर्षे पूर्ण!

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : पाटण तालुक्‍याचा इतिहास व भूगोल बदलणाऱ्या कोयनेच्या विनाशकारी भूकंपाला आज (शुक्रवारी) 54 वर्ष पूर्ण होत आहेत. या 54 वर्षांत कोयना परिसरात एक लाख 21 हजार भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्याची नोंद ठेवणाऱ्या कोयना प्रकल्पाच्या भूकंप वेधशाळेला अपुरा कर्मचारी वर्ग व संपत असलेले फोटोग्राफीक पेपरमुळे बंदीचा धक्का बसला आहे. कोयना प्रकल्पाच्या पाचपैकी दोन वेधशाळा यामुळे बंद पडल्या असून, कोयनेची मुख्य भूकंप वेधशाळा मार्चनंतर बंद पडण्याच्या मार्गावर आहे. भूकंप वेधशाळा बंद पडण्याचा फार मोठा धक्का कोयना प्रकल्पाला बसत असून, शासनाचे उदासीन धोरण याला कारणीभूत ठरत आहे.
 
कोयना धरणाच्या उभारणीवेळीच धरणाच्या पोटात कोयनानगर, महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरीत कोयना प्रकल्पाने भूकंप वेधशाळा उभारल्या आहेत. सेस्मौलौजिकल अब्जव्हेटरी या नावाने त्या ओळखल्या जातात. या भूकंपाच्या वेधशाळेत यामुळे 11 डिसेंबर 1967 च्या त्या विनाशकारी भूकंपाच्या धक्‍क्‍याची नोंद झाली होती. या भूकंप वेधशाळांत भूकंपाच्या धक्‍क्‍याची तीव्रता व भूकंपाचा केंद्रबिंदूच्या अंतराची माहिती काही क्षणात यामुळेच मिळते. कोयना प्रकल्पाने पाच ठिकाणी उभारलेल्या भूकंपाच्या वेधशाळा एकमेकांना पूरक आहेत. भूकंप झाल्यावर प्रत्येक भूकंप वेधशाळेतून घेतली जाणारी माहिती कोयनानगर येथील भूकंपाची मुख्य वेधशाळा संकलित करूनच भूकंपाचा रिश्‍टर स्केल व केंद्रबिंदूचे अंतर जाहीर करत असते. भूकंपाचे योग्य अनुमान काढण्यासाठी फोटोग्राफीक या परदेशी पेपरचा वापर केला जातो. कोयना प्रकल्पाच्या भूकंपाच्या किरनॉस या वेधशाळेत दररोज न जाणवणारे भूकंपाचे चार ते पाच भूकंपाचे धक्के नोंदले जातात. 

कोयना प्रकल्पाने उभारलेल्या पाच भूकंपमापन वेधशाळांपैकी महाबळेश्वर व रत्नागिरी वेधशाळा गेल्या वर्षी फोटोग्राफीक पेपर व पुरेशा कर्मचारी संख्येअभावी बंद पडल्या आहेत. याचा फटका कोयनानगर येथील भूकंपाच्या मुख्य वेधशाळेला बसत आहे. भूकंपमापन करण्यास यामुळे विलंब होत आहे. कोयनानगर येथील मुख्य भूकंपमापन केंद्रात मार्चनंतर वैज्ञानिक सहायक या पदावरील डी. एम. चौधरी हे एकमेव कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. या पदाचे दुसरे कोणतेच कर्मचारी या ठिकाणी कार्यरत नसल्यामुळे मार्चनंतर कोयनेची भूकंप वेधशाळा अपोआप बंद पडण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. कोयनेची मुख्य भूकंप वेधशाळा बंद पडल्यास त्याचा जोरदार धक्का राज्याला बसण्याची शक्‍यता आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

मच्छिंद्र कांबळी यांचं अजरामर 'वस्त्रहरण' नाटक पुन्हा भेटीला येणार; 'हा' कसलेला अभिनेता साकारणार तात्या सरपंच

Latest Marathi News Live Update : चाकण परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या बेकायदेशीर विक्रीचा भंडाफोड; २५१ सिलेंडर जप्त

SCROLL FOR NEXT