Sambhajiraje Udayanraje  
सातारा

आंदाेलन वगैरे करणे ही फालतूगिरी आता जाब विचारा जाब : उदयनराजे

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा - पुणे रस्त्याची (satara pune road) काय अवस्था आहे हे तुम्हांलाही माहित आहे. त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी मी पाठपूरावा करीत आहे. आज एनएचएआयचे (NHAI) अधिकारी यांच्यासमवेत माझा दाैरा आहे. माझ्या नियाेजीत कामांमुळे मी त्यांना आज तरी भेटू शकत नाही. परंतु ते माझे बंधू आहेत कधीही घरी येऊ शकतात असे खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या भेटीविषयी माध्यमांशी जलमंदिर पॅलेस येथे बाेलताना स्पष्ट केले. आमच्या भेटीबाबत उलट सुलट चर्चा सुरु असल्याचे तुमच्या माध्यमातून मला समजत आहे तरी काेणीही चुकीचा अर्थ काढू नका असे आवाहनही उदयनराजेंनी केले आहे. (maratha-reservation-udayanraje-bhosale-sambhajiraje-chhatrapati-meeting-postponed-satara-trending-news)

मराठा आरक्षणावरुन (maratha reservation) संभाजीराजे छत्रपती आणि तुमच्यांत वैचारिक मतभेद आहेत. संभाजीराजे सर्वांना भेटताहेत, प्रश्नावर चर्चा करताहेत परंतु तुम्हांला अद्याप भेटलेले नाहीत असा प्रश्न शिवराज्यभिषेक दिनी (shivrajyabhishek din) उदयनराजेंना माध्यमांनी केला हाेता. त्यावेळी उदयनराजेंनी ते माझे धाकटे बंधू आहेत. आमच्यांत काेणतेही मतभेद नाही असे स्पष्ट केले हाेते.

गुरुवारी संभाजीराजे छत्रपती यांनी काेल्हापूरात 16 जूनला मोर्चा नाही तर मूक आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत नमूद केले. याबराेबरच सकल मराठा समाजाच्या बैठकीत संभाजीराजे छत्रपतींनी उदयनराजेंची भेट घेणार आहे असेही सांगितल्याची चर्चा हाेती. त्यावेळेपासून संभाजीराजे छत्रपती खासदार उदयनराजेंना कधी भेटणार याची उत्सुकता सर्वांना लागली हाेती. ही भेट आज (शुक्रवार) पुण्यात हाेईल अशी चर्चा साता-यात सुरु झाली हाेती. दाेन्ही राजेंची भेट पुण्यात हाेईल असा अंदाज समर्थकांकडून गुरुवारी रात्रीपासून बांधला जात हाेता. दाेन्ही राजेंच्या भेटीपुर्वीचा दाेघांचा एक व्हिडिआे देखील समाज माध्यमातून व्हायरल करण्यात आला हाेता.

मराठा आरक्षण

दरम्यान आज आपल्याला एनएचएआयच्या अधिका-यांसमवेत सातारा पुणे रस्त्याबाबतच्या दुरुस्तीसाठी चर्चा करायची हाेती. त्याबाबत माझा दाैरा देखील आहे. माझा पुर्वनियाेजीत दाैरा असल्याने मी त्यांना आज भेटू शकणार नाही. ते माझे बंधू आहेत. मला भेटण्यासाठी ते कधीही घरी येऊ शकतात. त्यांच्या प्रत्येक गाेष्टीत मी त्यांच्यासमवेत आहे असा विश्वासही उदयनराजेंनी संभाजीराजे छत्रपतींच्या भेटीविषयी माध्यमांकडे व्यक्त केला. मी सर्वांना एकच सांगू इच्छिताे कोणीही याचा चुकीचा अर्थ काढू नका. आमची भेट होईल, विविध विषयांवर आम्ही चर्चा करणारच आहोत असेही उदयनराजेंनी नमूद केले. मराठा आरक्षणासाठी आता पुन्हा आंदाेलन वगैरे करणे ही फालतूगिरी आहे. खरं तर लाेकांनी आमदार खासदारांना जाब विचारला पाहिजे असेही राजेंनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT