Udayanraje Live : ..तर देशाचे तुकडे हाेण्यास वेळ लागणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale Top Breaking News in Marathi

..तर देशाचे तुकडे हाेण्यास वेळ लागणार नाही

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त (ShivRajyabhishek) (आज (रविवार) साता-यातील जलमंदिर पॅलेसच्या प्रांगणात उदयनराजे भाेसले (udayanraje Bhosale) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज (ChhatrapatiShivajiMaharaj) यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बाेलत हाेते. उदयनराजे म्हणाले शिवराज्याभिषेक दिन हा ख-या अर्थाने लाेकशाहीच्या स्थापनेचा पहिला दिवस. त्यानंतर रयतेचा सहभाग असावा म्हणून त्याकाळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापन केली. वेगवेगळ्या जाती धर्माच्या लाेकांना एकत्र केली. कूठेही भेदभाव केला नाही. त्याकाळी देशातील अथवा अन्य देशातील राजांनी स्वतःला राजा म्हणून मिरवले परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःला राजा म्हणून मिरवले नाही. यामुळेच त्यांची रयतेचा राजा म्हणून ख्याती आहे. स्वराज्याचा विचार मार्गी लावला. स्वराज्याच्या संकल्पना त्यावेळेचे जे रयतेचे राज्य हाेते ते आत्ता गेले काेठे आणि का असा प्रश्न उदयनराजेंनी केला. (satara-news-udayanraje-bhosale-maratha-reservation-shivrajyabhishekdin-breaking)

त्याकाळी लाेक बंधूभावाने राहत हाेते. आता त्यांच्यात दरार का पडली. काेणी केली आणि का केली. हे विचार केवळ माझ्या मनात येत नाही सर्वांच्या मनात येते. मन अत्यंत दुखी झालेले आहे. शिवाजी महाराज यांचा विचाराचे आचारण प्रत्येकाने केले पाहिजे. जाे येताे त्याला एक ना एक दिवस जावे लागते. श्वास कधी थांबेल याची श्वाश्वती देता येत नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अभिप्रेत असलेली ही लाेकशाही नाही. माणसा माणसांत दूरावा निर्माण झाल्यास देशाचे तुकडे हाेण्यास वेळ लागणार नाही. सध्या लाेक कूठे तरी दूरावत चालल्याचे जाणवते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने वागणे आवश्यक आहे. लाेकांमध्ये चालला दूरावा थाेपविण्यासाठी सर्वांना एकत्र ठेवणे ही जबाबदारी केवळ माझी नाही. सर्वांनी एकत्रित यावे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत.

Udayanraje Bhosale

Udayanraje Bhosale

काेणत्याही विचारास बळी न पडता तसेच प्रत्येकाने एकत्र राहणे गरजेचे आहे हीच छत्रपती शिवाजी महाराज यांना आपली वंदना ठरेल असेही उदयनराजेंनी नमूद केले.