नगरसेविकेचा अर्ज बाद sakal
सातारा

दहिवडीत नगराध्यक्ष नगरसेविकेचा अर्ज बाद

भाजपकडून डावलल्याचा परिणाम

रुपेश कदम :

दहिवडी : विद्यमान नगराध्यक्ष धनाजी जाधव यांना भाजपने डावलल्याने ते उमेदवारी अर्जासोबत जोडपत्र १ व २ (एबी फॉर्म)जोडू न शकल्याने छाननीत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. आज झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीमध्ये एकूण दहा उमेदवारी अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिली.दहिवडी नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी दाखल झालेल्या ८५ उमेदवारी अर्जांची प्रभागनिहाय छाननी करण्यात आली. नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण व महिलांसाठी आरक्षित असलेल्या १, ६, १४ व १७ या प्रभागांतील अर्जांची छाननी करण्यात आली नाही.

लक्षवेधी ठरलेल्या व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये विद्यमान नगराध्यक्ष धनाजी जाधव व दहिवडीच्या प्रथम नगराध्यक्षा साधना गुंडगे यांचे पती युवा नेते सिध्दार्थ गुंडगे यांनी भाजपकडून अर्ज भरले होते. भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असा ठाम विश्वास दोघांनाही होता. मात्र, त्यात सिध्दार्थ गुंडगे यांनी बाजी मारली. त्यात धनाजी जाधव यांनी इतर कोणत्याही प्रभागातून अर्ज भरला नसल्याने ते निवडणुकीतून बाहेर पडले आहेत. या प्रभागात दोन उमेदवारी अर्ज बाद झाले.

प्रभाग क्रमांक सातमध्ये एक उमेदवारी अर्ज बाद झाला. प्रभाग क्रमांक ११ मध्ये तीन उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यात विद्यमान नगरसेविका अर्चना खरात यांनी भाजपने उमेदवारी न दिल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. प्रभाग क्रमांक १२ मध्ये एक अर्ज, तर प्रभाग क्रमांक १५ मध्ये तीन उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.

छाननीनंतर आता युती-आघाडीसाठी पक्षीय बोलणी सुरू झाली आहेत. तसेच अर्ज काढण्यासाठी अपक्षांची मनधरणी सुरू झाली आहे. १३ तारखेपर्यंत अर्ज माघारीसाठी हालचाली सुरू राहणार आहेत. त्यानंतरच प्रचारात रंगत येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT