अधिकाऱ्यांनो कामकाजात हलगर्जीपणा नको; सभापती विश्वजितराजे निंबाळकर

ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना अधिकारी वर्ग सहकार्य करताना दिसून येत नाही
सभापती विश्वजितराजे निंबाळकर
सभापती विश्वजितराजे निंबाळकरsakal
Updated on: 

फलटण शहर : तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना अधिकारी वर्ग सहकार्य करताना दिसून येत नाही. आगामी काळामध्ये सर्वसामान्य शेतकरी, शेतकऱ्यांचे पाल्य व सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. जर कोणत्याही अधिकाऱ्याच्‍या बाबतीत कसलीही तक्रार आली तरी त्यावर कडक पावले उचलण्यात येतील. कामकाजात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा फलटण पंचायत समितीचे नूतन सभापती विश्वजितराजे नाईक-निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

सभापती विश्वजितराजे निंबाळकर
रस्त्यासाठी गोवारेकरांचा निवडणुकांवर बहिष्कार

सभापती विश्वजितराजे यांनी पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नूतन उपसभापती संजय सोडमिसे, सदस्य सचिन रणवरे, संजय कापसे, रेश्मा भोसले आदींची उपस्थिती होती. सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या नियुक्त ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित राहावे. आपल्या नियुक्त ठिकाणी जर उपस्थित राहता आले नाही, तर आपल्या वरिष्ठांना त्याबाबत पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील ग्रामसेवकापासून ते गटविकास अधिकाऱ्यांपर्यंत कोणीही जर आपल्या नियुक्त ठिकाणी नागरिकांना भेटत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आगामी काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समिती कटिबद्ध राहील, अशी ग्वाहीही सभापती विश्वजितराजे यांनी यावेळी दिली.

सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत, त्या योजना संबंधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. ज्यांना आगामी योजनेचा लाभ घ्यायचा आहे. परंतु, त्यांना प्रक्रिया माहीत नाही, त्यांनासुद्धा त्यांच्या गावामध्ये येऊनच मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांचे शासकीय काम हे संबंधित गावामध्येच पूर्ण करण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे. फलटण तालुक्यामधील बहुतांश ग्रामसेवक हे नियुक्त ठिकाणी बसत नाहीत. ग्रामपंचायतीमध्ये सांगतात की, ‘अण्णा फलटणला गेले आहेत’ वास्तविक ते फलटणलासुद्धा कामासाठी आलेले नसतात. आगामी काळात अशा प्रकारे जर कोणी ग्रामसेवक कामकाज करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सभापती विश्वजितराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Raju Shetti warning to sugar factories
Krishna Sugar Factory Karad
High Court Decision on Anil Desai and Rajendra Rajpure Election Eligibility Creates Legal Uncertainty for Seven Other Directors
Sonal Sonawane Success Story From Losing Her Husband to Building a Future for Two Children Through Courage and Determination
Marathi News Esakal
www.esakal.com