Shahajibapu Patil vs Ajit Pawar esakal
सातारा

Shahajibapu Patil : अजितदादांनी धर्मवीर संभाजी महाराज असं म्हटलं तर..; वादात शहाजीबापूंची उडी

'छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा स्वराज्य रक्षक हा अजित पवारांचा शब्द बरोबर आहे, पण..'

हेमंत पवार

'अजितदादांनी स्वराज्य रक्षक शब्दाबरोबर धर्मवीर संभाजी महाराज असं म्हटलं तर ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला आवडेल.'

कऱ्हाड : स्वराज्य रक्षक हा अजित पवार (Ajit Pawar) यांचा शब्द बरोबर आहे. परंतु, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य विस्तारक आणि कडवे हिंदू धर्मवीर होते. अजितदादांनी स्वराज्य रक्षक शब्दाबरोबर धर्मवीर संभाजी महाराज असं म्हटलं तर ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला आवडेल. तेवढा अजितदादांनी वैचारिक मोठेपणा दाखवावा, असं मत बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी इथं व्यक्त केलं.

कऱ्हाड (जि. सातारा) येथील एका खासगी कार्यक्रमानिमित्त आमदार शहाजीबापू पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांना धर्मवीर व स्वराज्य रक्षक म्हणण्यावरून सध्या राज्यात वाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वराज्य रक्षक हेच बरोबर आहे. धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक या शब्दावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून शहाजीबापू यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये.

शहाजीबापू म्हणाले, स्वराज्य रक्षक हा अजित पवार यांचा शब्द बरोबर आहे. परंतु, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य विस्तारक आणि कडवे हिंदू धर्मवीर होते. अजितदादांनी स्वराज्य रक्षक शब्दाबरोबर धर्मवीर संभाजी महाराज असं म्हटलं तर ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला आवडेल. तेवढा अजितदादांनी वैचारिक मोठेपणा दाखवावा, असं त्यांनी नमूद केलंय.

'वीज कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची धोरणं ही लोकहिताची आहेत, असं सांगून आमदार पाटील म्हणाले, 'महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. अशा पध्दतीचं धोरण आखलेलं आहे. जे धोरण सरकारनं स्वीकालेलं आहे, ते महाराष्ट्र राज्याच्या फायद्याच आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT