
आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला.
Sangli News: शिवप्रेमींच्या लढ्याला मोठं यश; 'त्या' जागेतच बसणार शिवरायांचा पुतळा, प्रशासन झुकलं!
Sangli News : सांगलीतील आष्टा (Sangli Ashta) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचा वाद आता पुन्हा पेटला आहे. आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला.
हेही वाचा: Sangli News: छत्रपती शिवाजी महाराजांचा रातोरात पुतळा हटवला; आंदोलकांची पोलिसांशी झटापट, 30 जणांना अटक
यावेळी परिसरात 144 कलम लागू करण्यात आलं होतं. आष्टा शहरात मध्यरात्री शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गनिमी काव्यानं प्रतिष्ठापना केली. दरम्यान, प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हठवण्यात आल्यानं या ठिकाणी रस्तारोको आंदोलन सुरू करण्यात आलं होतं.
हेही वाचा: Nanded News: हृदयद्रावक! गरोदर मुलीला माहेरी आणताना अपघात; बाप-लेकीसह गर्भातील बाळाचा वाटेतच मृत्यू
याप्रकरणी सांगली पोलिसांनी (Sangli Police) 30 जणांना ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता होती. मात्र, यावर तोडगा काढण्यात आल्यामुळं आंदोलकांच्या प्रयत्नाला यश आल्याचं बोललं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेच्या हस्तांतरणाला परवानगी देण्यात आल्यानं यावर तोडगा निघाला आहे. प्रशासनानं हा निर्णय घेतल्याबद्दल आष्ट्यामध्ये जल्लोष करण्यात येत आहे.