सातारा

खाकीच्या डाेळ्यातून ओघळले अश्रु; आईसह मुलगा जळून खाक

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : पाटण तालुक्यातील मोरेवाडी- कुठरे येथील लोकरी वस्तीत मायलेकाचा जळून मृत्यू झाल्याची  धक्कादायक घटना आज (साेमवार) सकाळी उघडकीस आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. दोघांचाही मृतदेह जळून खाक झाले होते. या दाेघांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. ही हत्या की आत्महत्या याचा पोलिस तपास घेत आहेत.

कुठऱ्याच्या मोरेवाडीतील लोकरी वस्तीची पहाट आज मायलेकांच्या मृत्यूच्या विदारक प्रसंगाने उजाडली. सचिन ज्ञानदेव लोकरे (वय 38) , कमल ज्ञानदेव लोकरे (62) अशी मृतांची नावे आहेत. सचिन व त्याच्या आईचा जळून दुर्देवी अंत झाला. घराला आतून कडी लावली होती. पुठ्ठे मोठ्या प्रमाणात पेटनलेही होते. दोघेही ज्या ठिकाणी झोपले होते. तेथेच जळून खाक झाले होते. सचिन याचा दोन दिवसापूर्वी कोरोनाचा स्वॅब घेतला होता. रात्री त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. स्वॅब घेतल्यापासून सचिन डिस्टर्ब होता, असे गावकऱ्यांनी पाेलिसांना सांगितले. 

सचिनचे वडील कऱ्हाडच्या कृष्णा हाॅस्पीटलमध्ये उपचारास दाखल आहेत. त्यांच्या पायाची शस्त्रक्रीयी झाली आहे. त्यामुळे त्याचाही ताण त्याच्यावर होता. रविवारी सायंकाळी सचिनचा भाऊ कृष्णा हाॅस्पीटलला वडिलांकडे गेला. त्यानंतर रात्री उशिरा मायलेकां सोबत दुर्घटना घडली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याचा तपास सुरू आहे.

सात वर्षाच्या तुनजाने वडिलांना वाचवले

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: पहिल्या यादीत ५३३ शेतकऱ्यांना कर्जमाफी; सहकारमंत्र्यांची माहिती, प्राप्तिकर विभागाच्या माहितीअभावी विलंब

IPL परकीय चलन प्रकरणात ललित मोदींना १६ वर्षांनंतर आफ्रिकेतील न्यायालयाचा दिलासा; ईडीचा दंड रद्द

Latest Marathi Update : 'चलो संसद' आंदोलनामुळे दिल्लीतील १६ मेट्रो स्थानके आजही बंद; कडक सुरक्षा व्यवस्था

Pune Congress Protest: विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ पुणे काँग्रेस आक्रमक; मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

अर्थपूर्ण पर्स : गरज आणि चैनीतला फरक ओळखा

SCROLL FOR NEXT