Nitesh Rane Mujawar Colony Blast esakal
सातारा

Nitesh Rane : 'मुजावर कॉलनीत स्फोट, जातीय रंग देत राणेंनी तोडले अकलेचे तारे'; गुन्हा दाखल करण्याची मागणी

नितेश राणेंनी मुजावर कॉलनीत घडलेल्या स्फोटाबाबत घटनास्थळी भेट देऊन आपल्या अकलेचे तारे तोडले.

सकाळ डिजिटल टीम

मुळात स्फोटाच्या घटनेमध्ये मृत्यू झालेला (कै.) शरीफ मुल्ला हा आरटीआय कार्यकर्ता व समाजहिताच्या प्रश्नावर आवाज उठवणारा कार्यकर्ता होता.

कऱ्हाड : कऱ्हाडला सर्वजण गुण्यागोविंदाने राहत आहेत. इथल्या गोष्टीसाठी प्रतिनिधी व नागरिक सक्षम आहेत. आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बाहेरून येऊन तेढ निर्माण करून भावना भडकवू नयेत. त्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी समता पर्वच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे केली.

पत्रकात म्हटले आहे, की आमदार नितेश राणे यांनी मुजावर कॉलनी (Mujawar Colony Blast) या ठिकाणी घडलेल्या स्फोटाबाबत घटनास्थळी भेट देऊन आपल्या अकलेचे तारे तोडून पीडित कुटुंबाबाबत चुकीचे विधान करून कऱ्हाड शहरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.

मुळात स्फोटाच्या घटनेमध्ये मृत्यू झालेला (कै.) शरीफ मुल्ला हा आरटीआय कार्यकर्ता व समाजहिताच्या प्रश्नावर आवाज उठवणारा कार्यकर्ता होता. त्यांनी कऱ्हाड शहरामध्ये प्रदूषण होणाऱ्या बाराडबरे परिसरातील कचरा डेपोबाबत व मोकाट कुत्र्यांबाबत आवाज उठवला होता. हे मुस्लिम कुटुंब सर्वधर्म समभावाने राहणारे होते. हे सर्व चळवळीतील नागरिकांना व जनतेला माहीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT