सातारा

सहायक फौजदारास 20 हजारांची लाच घेताना पकडले

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : कोरेगाव पोलिस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुटख्याच्या केसमध्ये मदत करतो, जामिनावर सोडण्यास मदत करतो, म्हणून 20 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना सहायक पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथे पकडले. 

प्रल्हाद श्रीरंग पाटोळे असे या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदाराच्या भावावर गुटख्याची केस दाखल असून, त्यात मदत करतो, जामिनावर सोडण्यास मदत करतो, यासाठी पाटोळे याने 20 हजारांच्या लाचेची मागणी केली. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल (ता. पाच) पडताळणी केली. त्यानंतर (शनिवारी, ता.6 मार्च) 20 हजारांची लाच स्वीकारताना सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद पाटोळे यास पकडले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला व अविनाश जगताप, पोलिस नाईक राजे, ताटे, खरात यांच्या पथकाने कोरेगाव येथे सापळा रचून ही कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला तपास करत आहेत. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारचा मोठा निर्णय! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची नवीन पॉलिसी; जीआर आला

Nandurbar Fertilizer Scam : नंदुरबारमध्ये खत घोटाळ्याचा पर्दाफाश! 1030 शेतकऱ्यांच्या नावावर बोगस विक्री; कृषी विभागाकडून झाडाझडती सुरू

Latest Marathi News Live Update : नारीशक्ती विधेयक मांडण्याच्या बाजूने २५१ मतं

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

SCROLL FOR NEXT