Satara Latest Marathi News 
सातारा

कानून के हाथ बहुत लंबे होते है! पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला साताऱ्यात अटक

विजय सपकाळ

सातारा : पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे याच्या सातारा पोलिसांनी जावळी तालुक्‍यातील मेढा परिसरातून आज सायंकाळी मुसक्‍या आवळल्या. याबाबत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक तपशील सांगण्यास अजून वेळ लागेल, अशी प्रतिक्रिया दिली. 

खून केल्याच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असणारा पुणे येथील कुख्यात गुंड गजा मारणे याची सात वर्षांनंतर सुटका झाली होती. यानंतर त्याच्या समर्थकांनी मारणे याची मोठी रॅली काढली होती. या रॅलीबाबत प्रश्न निर्माण झाल्यानंतर पुणे पोलिसांनी मारणे विरोधात गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्यात मारणे याने पोलिसांना अंधारात ठेऊन पुणे जिल्हा न्यायालयातून जामीन मिळवला होता. जामीन मिळाल्यापासून मारणे हा गायब झाला होता. याच काळात दुकानावर येऊन वडापाव आणि पाण्याच्या बाटल्या जबरदस्तीने नेल्याची फिर्याद एका विक्रेत्याने पुणे पोलिसांकडे नोंदवली होती. हा गुन्हा दाखल झाल्यापासून मारणे हा फरारी होता. 

यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिस दल अलर्ट केले होते. फरारी असणाऱ्या मारणे याचा शोध सुरू केला होता. फरारी असणारा मारणे साथीदारांसमवेत मेढा भागात असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली. यानुसार त्यांनी मेढा चौकात तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान पोलिसांनी एक चारचाकी अडवली त्यात चार माणसे होती. त्यांना ताब्यात घेतले असता एका व्यक्तीचे वर्णन मारणे याच्याशी जुळत होते. त्या गाडीतून दीड लाखाची रोकडसुद्धा जप्त करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या चारपैकी एक जण मारणे यांच्यासारखा दिसत असल्याने केलेल्या चौकशीत त्याने स्वतः गजा मारणे असल्याचे सांगितले. त्याने सांगितल्यानुसार शहानिशा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होते. याबाबत अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याशी संपर्क साधला असता माहिती देण्यास वेळ लागेल, असे सांगितले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result : अन्सर कीमध्ये ६०९, निकाल लागताच ५४० पण दोन तासांनी १६७ गुण; नीट निकालात गोंधळ, विद्यार्थीनीचे गंभीर आरोप

IND vs ENG: लॉर्ड्सवर रोहित-कोहली रचणार इतिहास! सचिन-द्रविडलाही मागे टाकत करणार '400'चा महाविक्रम

Latest Marathi News Live Update : शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत सरकार अपयशी - AICC सरचिटणीस सचिन पायलट

Beed News: भ्रष्टाचार उघड होताच रातोरात काम सुरू? बीडमध्ये नेमकं काय घडलं?

सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली अधिकृत माहिती, पत्नीचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT