सातारा

वडूज : मतदान अधिकाऱ्यास मारहाण; शिक्षक संघटना संतप्त

संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या मायणी येथील प्रसाद महामुनी या शिक्षकास वडूज तहसील कचेरीसमोरच महसूल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्याबाबतची फिर्याद घेण्यास पोलिसांनी चालढकल केल्याने शिक्षक संघटना संतप्त झाल्या आहेत. संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
 
मायणीतील प्रसाद महामुनी हे कठरेवाडी येथे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांना चितळी (ता. खटाव) येथील मतदान केंद्रावर मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मतदान संपल्यानंतर मतदान साहित्य जमा करण्यासाठी सर्व सहकाऱ्यांसोबत ते वडूजला गेले. नियोजित टेबलवर साहित्य जमा करीत असतानाच त्यांना एका मित्राने मेनरोडवर वाहतूक कोंडी झाली असून लोकांनी तुमच्या गाडीची हवा सोडली असल्याचे सांगितले. त्यामुळे महामुनी यांनी तातडीने गाडीकडे गेले. तेथे निवास कदम व सात ते आठ महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महामुनींना शिवीगाळ करत मारहाण केली. अन्य शिक्षक सहकाऱ्यांनी मारहाणीतून त्यांची सुटका केली.

क-हाडातील वाहतुकीत बदल; मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर पाेलिसांचा निर्णय

मारहाण केल्याबाबत तक्रार देण्यासाठी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीसह महामुनी वडूज पोलिस ठाण्यात गेले. पोलिस अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करून येण्यास सांगितले. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयात ते गेले. तेथे संबंधित डॉक्‍टरांनी वैद्यकीय प्रमाणपत्र पोलिसांकडे पाठवतो, असे त्यांना सांगितले. परत गेल्यानंतर पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली, असे महामुनी यांनी सांगितले. तुम्ही गाडी रस्त्यावर लावून बारमध्ये गेला होता, असा खोटा आरोप करत पोलिसांनी तहसील कचेरीसमोरील बारमालकांना बोलावून घेतले. पोलिसांना सोबत जाऊन बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये कुठेही मी दिसून आलो नाही, असे महामुनी यांचे म्हणणे आहे. न्यायासाठी शिक्षक संघटनांनी तहसीलदारांचे दार ठोठावले आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले असून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई, पुणे, काेल्हापूरहून साता-याला येताय! त्यापुर्वी हे वाचा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT