Pusesawali Riots Controversial Posts Internet Service Off esakal
सातारा

Pusesawali Violence : पुसेसावळीत दंगलीचा भडका उडताच इंटरनेट सेवा बंद; जाळपोळीनंतर गावात कर्फ्यू, कधी सुरु होणार Internet?

पुसेसावळीत मोठ्या प्रमाणावर युवक जमा झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.

सकाळ डिजिटल टीम

इंटरनेट बंद असल्‍याने शाळेतील शिक्षकांनी या निर्णयाची माहिती फोनद्वारे पालकांना देत मुलांना नेण्‍याच्‍या सूचना केल्‍या.

सातारा : खटाव तालुक्यातील पुसेसावळी (Pusesawali Riots) इथं समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर रविवारी (ता. 10) रात्री उशिरा जाळपोळीची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत.

या घटनेमुळं परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून स्थानिक पोलिस प्रशासनानं परिस्थिती नियंत्रण आणली होती; परंतु परिसरातून मोठ्या प्रमाणावर युवक जमा झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. सातार्‍यातून तातडीनं पोलिस कुमक आल्याने जमाव पांगवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

या दंगलीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात 72 तासांसाठी इंटरनेट सेवा (Internet Service) बंद करण्यात आली आहे. पुसेसावळीत दंगल भडकल्‍यानंतर याची माहिती सातारा पोलिस दलानं गृह विभागास दिली. गृह विभागानं खबरदारी म्‍हणून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्‍याच्‍या सूचना संबंधित कंपन्‍यांना केल्‍या. यानुसार बुधवारी (ता. १३) मध्‍यरात्री १२ पर्यंत जिल्‍हाभरातील इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

तणावानंतर शाळांना सुटी

दंगलीमुळं निर्माण झालेल्‍या तणावानंतर सातारा शहर व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांनी खबरदारीचा उपाय म्‍हणून सोमवारी शैक्षणिक कामकाज दुपारनंतर थांबवण्‍याचा निर्णय घेतला. इंटरनेट बंद असल्‍याने शाळेतील शिक्षकांनी या निर्णयाची माहिती फोनद्वारे पालकांना देत मुलांना नेण्‍याच्‍या सूचना केल्‍या. यामुळे दुपारनंतर अनेक शाळा, महाविद्यालयांच्‍या आवारात पालकांची मोठी गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT