Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

फलटण-सातारा मार्गावर ट्रकचालकांना लूटणाऱ्या उस्मानाबादच्या पाच जणांना पोलिस कोठडी

रमेश धायगुडे

लोणंद (जि. सातारा) : फलटण-सातारा रस्त्यावर रात्रीच्या वेळी जॅक टाकून जॅकचे आमिष दाखवून ट्रकचालकांना लुटणारी टोळी लोणंद पोलिसांनी सापळा रचून शिताफीने जेरबंद केली. याप्रकरणी पाच जणांना अटक करून त्यांना फलटण येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, आदर्कीमार्गे जाणाऱ्या फलटण- सातारा रस्त्यावर प्रसाद स्टोन क्रेशरच्या हद्दीतील खिंडीत वाहनांसाठी लागणारा जॅक टाकून ट्रकचालकांना मारहाण करून लूट करणारी टोळी गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत होती. अनेक ट्रकचालकांना या प्रकारे लुटण्याचे प्रकार येथे घडले आहेत. त्यामुळे लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी व त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक गणेश माने हे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्याभरापासून रात्रगस्त घालून नजर ठेऊन होते. 

दरम्यान, काल रात्री या रस्त्यावर पुनर्वसन येथे लाल रंगाचा जॅक टाकून काही संशयित असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक चौधरी यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी जाऊन सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून रामदास बापू काळे, पिंटू शहाजी काळे, दशरथ लक्ष्मण काळे, तानाजी अशोक काळे, सचिन अशोक काळे (सर्व रा. पारा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) आदी पाच जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून लोखंडी कोयता, लाकडी दांडके, मिरची पूड, नॉयलानची दोरी, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी रॉड आदी हत्यार जप्त केली आहेत. 

अमिर खानावर कारवाई केलेले हवालदार संजय साबळे पुन्हा चर्चेत

या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक चौधरी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, पोलिस हवालदार महेश सपकाळ, अविनाश नलवडे, चालक विजय शिंदे, अविनाश शिंदे, गोविंद आंधळे, श्रीनाथ कदम, संतोष नाळे, सागर धेंडे, अभिजित घनवट, केतन लाळगे, फैय्यज शेख, अमोल पवार, शशिकांत गार्डी, ज्ञानेश्वर साबळे, नाना होले, अनिल भोसले आदी सहभागी झाले होते. सर्व संशयित ऊसतोडणी कामगार आहेत. दिवसभर ऊसतोडणीचे काम करून रात्री गुन्हे करत होते. यामुळे या मार्गावरून जा- ये करणारे वाहनचालक व प्रवासी यांच्यात भीतीचे वातावरण होते. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT