Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

पाणीवाटपावरून म्हासुर्णेत सख्या भावाचा खून; वडिलांसह दोघांवर गुन्हा

शशिकांत धुमाळ

औंध (जि. सातारा) : विहिरीतील पाण्याच्या वाटपावरून भावाने डोक्‍यात काठी मारल्याने सख्या भावाचा मृत्यू झाला. या वेळी वडिलांनीही मुलाला मारहाणा केली. भाऊसाहेब पांडुरंग माने (वय 49, रा. म्हासुर्णे, ता. खटाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संजय पांडुरंग माने (वय 46) याला ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 11) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास खैरवाडा शिवारात भाऊसाहेब हे विहिरीच्या पाण्याच्या वाटपासंदर्भात विचारायला गेल्यानंतर संजय पांडुरंग माने यांच्याशी त्यांचा वाद झाला. या वेळी संजय यांनी भाऊसाहेब यांना काठीने मारहाण केली. भाऊसाहेब यांचे वडील पांडुरंग देवबा माने यांनीही त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यात भाऊसाहेब हे बेशुद्ध पडले. या वेळी अन्य काहींनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु दोघांनी सर्वांना हाकलून लावले. 

मायणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले. मात्र, रात्री उशीर झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना घरी नेले. त्यानंतर भाऊसाहेब यांना रात्रभर रक्ताच्या उलट्या झाल्या. नातेवाईकांनी त्यांना आज सकाळी वडूजच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संजय माने व पांडुरंग माने या बापलेकाविरुद्ध वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली १५ वर्षांची भारतीय नेमबाज अखेर सापडली! पोलीस तपासात कोणतं कारण समोर आलं?

Success Story: 1.5 लाखांची मुंबईतील नोकरी सोडून गावाकडे आला; आता महिन्याला कमावतोय 4 लाख रुपये! काय आहे गुंतवणुकीचा मंत्र?

Latest Marathi News Live Update : रामभक्तांवर रामरक्षा करण्याची वेळ भाजपानं आणली - उद्धव ठाकरे

Tukaram Mundhe : 'एआय'च्या मदतीने अन्नभेसळखोरांवर नजर! नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा इतिहास मिळणार एका क्लिकवर

Car Accident : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; परभणी जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT