arrest esakal
सातारा

जिलेटीन स्फोटकाच्या साठाप्रकरणी वाळव्यातील एकास अटक

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी बेकायदेशीर स्फोटकांच्या माहिती काढून करवाईचे आदेश दिले होते.

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : तारळेतील स्फोटकाच्या 103 किलोंच्या साठाप्रकरणी पोलिसांनी राजस्थानी (rajashtan) व्यापाऱ्यासह त्याला स्फोटक पुरवणाऱ्यासही अटक (arrest) केली आहे. भरवस्तीतील घरात अवैधरीत्या व वस्तीला धोका पोचवणारा स्पोटकांच्या साठा काल जप्त झाला. दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केली होती. त्यात गोविंदसिंग बाळूसिंग राजपूत ऊर्फ यादव (वय 42) याला रात्री अटक झाली. त्यासोबत त्याला स्फोटक पुरवणारा त्याचा साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे. रतनलाल बाळोजी जाट (वय 42 वर्ष, रा. वाटेगाव, ता. वाळवा) असे त्याचे नाव आहे. दोघांनाही न्यायालयाने 15 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. satara crime news police arrests two tarale gelatin

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी बेकायदेशीर स्फोटकांच्या माहिती काढून करवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार सातारा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाली. दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रताप भोसले यांच्या पथकाने उंब्रज पोलिसांच्या मदतीने तारळेत छापा टाकला. त्यात स्फोटकांचा 103 किलोंचा साठा हस्तगत झाला.

गोविंदसिंग बाळूसिंग राजपूत ऊर्फ यादवला याला गुरुवारी रात्री उशिरा अटक झाली आहे. राजपूतच्या घराशेजारील कुलूप बंद शौचालयासमोर उभ्या जीपमध्ये जिलेटीन कांड्या व डिटोनेटर्स वायरसह पोलिसांना सापडले आहे. छाप्यात नऊ हजार 453 रुपयांच्या 103 किलोंच्या 836 जिलेटिन कांड्या जप्त केल्या आहेत. स्फोटक ठेवलेली जीपही पोलिसांनी जप्त केली आहे. प्रकारणात त्याला स्फोटके पुरवणारा वाळवा तालुक्‍यातील वाटेगाव येथील रतनलाल जाट नावाच्या राजस्थानी व्यापाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

जाटने राजपूतला स्फोटके सप्लाय केली होती. त्याचीही चौकशी होणार आहे. हवालदार सागर भोसले यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईत श्री. कुंभार यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक प्रताप भोसले, हवालदार सागर भोसले, सुमित मोरे, अनिकेत अहिवळे, केतन जाधव व नीलेश बच्छाव हे सहभागी होते. सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

SCROLL FOR NEXT