Satara Latest Marathi News 
सातारा

धक्कादायक! दहावीत शिकणाऱ्या मुलाच्या अभ्यासाच्या तणावातून आईची आत्महत्या

गिरीश चव्हाण

सातारा : दहावीत शिकणाऱ्या मुलाच्या अभ्यासाच्या तणावातून आईने विषारी द्रव पिवून आत्महत्या केल्याची घटना ता. 3 रोजी जावली तालुक्‍यातील रुईघर येथे घडली. सविता शाम निकम असे त्या महिलेचे नाव आहे. 

जावली तालुक्‍यातील रुईघर येथे शाम आनंदा निकम हे पत्नी सविता, मुलगा सुशांत यांच्यासमवेत राहण्यास आहेत. मुलगा सुशांत हा इयत्ता दहावीत शिकण्यास आहे. कोरोना व इतर कारणामुळे मध्यंतरीच्या काळात शाळा बंद होत्या. शाळा बंद असल्याने सुशांतचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते. शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरु झाल्यानंतरही सुशांतची इयत्ता दहावीच्या अभ्यासातील प्रगती अत्यंत धीमी होती. यामुळे त्याची आई सविता या सतत तणावात असायच्या. 

याच तणावातून सविता निकम (वय 35) यांनी बुधवारी (ता. 3) सकाळी गवतावर मारण्याचे विषारी द्रव पिले. सविता यांनी विषारी द्रव पिल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी वाई येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतानाच सविता यांचा मृत्यू झाला. याची प्राथमिक नोंद मेढा पोलिस ठाण्याच्या अखत्यारीतील कुडाळ दुरक्षेत्रात झाली असून तपास हवालदार डी.जी. शिंदे हे करीत आहेत.  

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

IND vs WI 5th T20I: पाऊस थांबला, ९ वाजता टॉस, सव्वा नऊ वाजता मॅच सुरू होणार; वाचा किती षटकांचा सामना रंगणार

Beed News : बीडमध्ये महायुतीच्या सभेत भाजपच्या दोन आमदारांची दांडी; पंकजाताईंच्या टोमण्याने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

Congress Mega Rally : अखेर दिल्ली पोलिसांची काँग्रेसला 'एनओसी'; ऐतिहासिक रामलीला मैदानावर ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, 'ही' आहे तारीख!

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : महसूलमंत्री बावनकुळे

SCROLL FOR NEXT