satara city 
सातारा

"रोटरी'तर्फे पोलिस ठाण्यांसह चौक्‍यांचे निर्जंतुकीकरण

प्रविण जाधव

सातारा : शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात पोलिस मोठ्या प्रमाणावर बाधित येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर येथील रोटरी क्‍लब सेव्हन हिल्सच्या वतीने शहरातील सर्व पोलिस ठाणी व पोलिस चौक्‍यांचे मशिनद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात आले. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलिस दल सातत्याने प्रयत्न करत आहे. नागरिकांशी सातत्याने येणाऱ्या संपर्कामुळे सातारा शहर व जिल्ह्यातील पोलिस मोठ्या संख्येने बाधित येऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण होणे आवश्‍यक होते. त्यासाठी रोटरी क्‍लब सेव्हन हिल्सच्या वतीने शहरातील सर्व पोलिस ठाणी व पोलिस चौक्‍यांचे मशिनद्वारे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला. मशिनच्या साह्याने त्यांनी शहरातील सर्व पोलिस ठाणी व चौक्‍यांचे निर्जंतुकीकरण केले. या उपक्रमामुळे संसर्गाच्या भीतीचे वातावरण निवळण्यास मदत झाली. या वेळी रोटरी क्‍लब सेव्हन हिल्सचे अध्यक्ष संदीप कोठावळे, सचिव केतन टंकसाळे, संदीप सुतार, नरेंद्र शेलार, निरंजन फडणीस, संतोष खटावकर, अजित करडे, समीर पंडितराव उपस्थित होते. या कामाचे प्रोजेक्‍ट मॅनेजर म्हणून अजय शिंदे यांनी काम पाहिले. या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी रोटरी क्‍लब सेव्हन हिल्सचे कौतुक केले. थोड्याच दिवसांत सातारा तालुक्‍यामध्ये येणारी पोलिस ठाणी व चौक्‍यांचे निर्जंतुकीकरण करून देणार असल्याची माहिती क्‍लबचे अध्यक्ष संदीप कोठावळे यांनी दिली. 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

SCROLL FOR NEXT