सातारा

प्रेमविवाहानंतर दोन महिन्यांनी ते आले एकत्र अन् गावात झाला राडा

सकाळ वृत्तसेवा

वाठार स्टेशन : वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथे प्रेमप्रकरणातून दोन गटांत झालेल्या राड्यामुळे संपूर्ण गाव बंद पडले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीतून चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 

प्रतीक काळोखे याच्या फिर्यादीवरून राजेखान पठाण (वय 69), इस्माईल अदिल इनामदार (रा. वाठार स्टेशन) यांच्यावर तर, राजेखान पठाण यांच्या फिर्यादीवरून प्रतीक काळोखे व गणेश घाडगे (दोघे रा. वाठार स्टेशन) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीकच्या चुलत भावाने दोन महिन्यांपूर्वी राजेखान यांच्या नातीशी आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता.
दोघांनीही आपल्या घरी याबाबतची माहिती दिली नव्हती. आळंदीवरून आल्यानंतर दोघेही एकत्र न राहता आपापल्या घरी राहण्यासाठी गेले होते. त्यामुळे दोघांच्याही कुटुंबीयांना याबाबतची कल्पना नव्हती. दोन दिवसांपूर्वी मुलाने मुलीला स्वत:च्या घरी राहण्यासाठी नेले. दुसऱ्या दिवशी मुलीचे आजोबा तिला आणण्यासाठी मुलाच्या घरी गेले. त्या वेळी मुलाच्या घरासमोर वादावादी झाली. त्यातून गाडी फोडण्याचा प्रकार झाला होता. 

काल सायंकाळी प्रतीक हा गणेशसोबत बाजार चौकात आला होता. त्याचवेळी राजेखान व इस्माईलही तेथे आले होते. प्रेमविवाहावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली. त्यातून एकमेकांवर तलवारीने वार झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, ही मारामारी झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या सुमारे 200 जणांचा जमाव बाजार चौकात जमला होता. त्यामुळे वाठार स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा मारामारीचा निषेध नोंदविण्यासाठी ग्रामस्थांनी आज गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे गावात आजही तणावपूर्ण शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गावातील प्रत्येक चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
 
उदयनराजे... सातारकरांच्या विश्‍वासाला तडा जातोय! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शास्त्राने वार करत...; शिवसेना आमदारावर हल्ल्याचा आरोप

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

Pune Crime: शेअर रिक्षातील गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ महिलेची एक लाखांची सोनसाखळी लंपास

Pune Fraud: वाघोलीत बनावट जिल्हाधिकारी व तहसीलदार आदेश प्रकरण उघड: शेतजमीन नोंदणीसाठी शासनाची फसवणूक

Pune Crime : येरवड्यात आरडाओरड्याचा जाब विचारल्याने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आरोपी शोएब कुरेशी अटकेत

SCROLL FOR NEXT