Krishna Sugar Factory esakal
सातारा

सातारा : कृष्णा कारखान्याने भरला २२ कोटींचा जीएसटी कर

कारखान्याचा वस्तू व सेवाकर विभागाने कारखान्याचा गौरव केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

रेठरे बुद्रुक : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने जीएसटी करापोटी २२ कोटी रुपयांचा भरणा करत शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. त्याबद्दल कारखान्याचा वस्तू व सेवाकर विभागाने कारखान्याचा गौरव केला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांत सर्वच संस्थांना मोठ्या आर्थिक अडचणीतून वाटचाल करावी लागली. मात्र, अशा परिस्थितीतही कारखान्याने अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत सहकार व उद्योग क्षेत्रात स्वत:ची छाप पाडली आहे. कृष्णा कारखान्याने शासनाकडे जीएसटी करापोटी २२ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. शासकीय महसुलामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाच्या उपायुक्त टी. डी. मोरे यांच्या हस्ते कृष्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. राज्य कर उपायुक्त ठाणेकर, श्री. सोरटे, कारखान्याचे फायनान्स मॅनेजर जयेंद्र नाईक, टॅक्स अकाउंटंट विठ्ठल साळुंखे आदी उपस्थित होते.

कृष्णा कारखान्याने २०२१-२२ या आर्थिक वर्षात २२ कोटींचा जीएसटी कर भरला आहे. याशिवाय व्हॅट म्हणजेच मूल्यवर्धित करापोटी सुमारे ९० कोटींचा भरणा शासनाकडे केला आहे. त्यामुळे जीएसटी आणि व्हॅट कर भरण्यात कृष्णा कारखाना आघाडीवर राहिला असून, सर्वाधिक व्हॅट कर भरणारा कारखाना म्हणूनही कृष्णा कारखान्याचा लवकरच सन्मान केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT