वडूजमध्‍ये बंद 
सातारा

गजबजलेल्या बाजारपेठेत दहाच मिनिटांत शुकशुकाट...

सकाळ वृत्तसेवा

वडूज (जि. सातारा) : वडूज हे तालुक्‍याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे कायमच दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबरच नागरिकांची वर्दळ दिसून येते. कोरोना संसर्ग व त्यानंतर लॉकडाउनमुळे बाजारपेठच बंद होती. त्यामुळे येथे शुकशुकाट दिसत होता. पण, गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनमध्ये शिथीलता जाहीर झाल्यानंतर येथील बाजारपेठेत नागरिकांची पुन्हा गर्दी दिसून येत होती.

अशातच आज शहरापासून जवळच असणाऱ्या सातेवाडी गावच्या हद्दीतील एका 76 वर्षीय महिलेचा घशातील स्त्राव तपासणीचा अहवाल पॉझीटीव्ह आला. सदरची महिला व तिच्याबरोबर अन्य कुटूंबातील व्यक्ती हे मुंबईहून आले होते. त्यावेळी शिरवळ येथे त्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांचा अहवाल आज आला. 

या कुटूंबातील महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याची चर्चा शहरात होऊ लागली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी शहरातील व्यवसायिकांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या येथील बाजार पेठेत नागरिक व ग्राहकांची एकच दैना उडाली. अनेक व्यवसायिकांनी आपले दुकानातील काही साहित्य बाहेर मांडले होते. ते दुकानात ठेवण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली. नेहमी गजबज असणाऱ्या येथील बाजारपेठेत अवघ्या दहाच मिनीटांत पुन्हा सन्नाटा पसरला. 

पुन्हा लॉकडाउन... पुन्हा वर्क फ्रॉम होम 
कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊनमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिथीलता आल्यानंतर काही व्यवसाय सुरू झाले. पण, आज शहरानजिकच कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने पुन्हा काही कालावधीसाठी शहरात लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे व्यावसायिकांना आपले संगणक आदी साहित्य घरी नेऊन काम करण्याशिवाय पर्याय राहीला नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका

Success Story: कठीण परिश्रम आणि चिकाटीचा फळ; यूपीएससीत गोंदियाच्या श्रवण मुंदडा याला २७५ वा रॅंक

Anurag Dobhal: १५० किमी वेगात कारची धडक; लाईव्हमध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न? बिग बॉस स्टार अनुराग डोवालचा VIDEO समोर

Beed News: डोळेच काय, माझा मुलगाच घ्या; वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, उपस्थितांना आले गहिवरून

SCROLL FOR NEXT