Satara Latest Marathi News 
सातारा

साताऱ्यात कृषी स्वावलंबन योजनेतून तब्बल 120 विहिरी पूर्ण; कृषी विभागाची माहिती

गिरीश चव्हाण

सातारा : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कोरोनाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांची निवड करून प्रत्येकी अडीच लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे. या अनुदानातून जिल्हाभरात 120 विहिरींचे काम पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. 

कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन विविध योजनेचा लाभ दिला आहे. कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमधून जिल्ह्यातील सुमारे 120 अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या योजनेचा सोळशी (ता. कोरेगाव) येथील आवाडे या लाभार्थ्यांच्या विहिरीचे प्रातिनिधिक स्वरूपात कृषी सभापती मंगेश धुमाळ व कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी कृषी अधिकारी शिवाजी भांडवलकर, आकाश सोळसकर, धनंजय सोळसकर, देवाआप्पा सोळसकर, अमोल सोळसकर, यशवंत धुमाळ, किशोर धुमाळ आदी उपस्थित होते. 

शेतकरी सक्षमीकरणासाठी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. यामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांच्या विहिरींचे काम पूर्णत्वास नेले आहे. पुढील काळातही जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन मंगेश धुमाळ यांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News:प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अपारदर्शक कारभार; ‘लीगल नोटीस’ विभाग ऑगस्टपासून बंद; पुणे, पिंपरी-चिंचवडची हवा गुणवत्ता निर्देशांक उपलब्ध नाही!

Organ Donation: आईचा मुलासाठी धाडसी निर्णय! जटिल किडनी प्रत्यारोपणातून मुलाला मिळाले नवजीवन; तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांना आले यश..

EPFO Interest Update : होळीला कोट्यवधी भारतीयांना मिळणार खुशखबर ! PF वर मिळणार तब्बल 'इतके' व्याज, CBT बैठकीत मोठा निर्णय ?

Mumbai News: महिलांच्या हातामध्ये आता ‘पॅनिक बटण’, यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचर; वापर कसा करायचा?

T20 WC, IND vs WI : जसप्रीत बुमराहने ३ चेंडूंत फिरवलेली मॅच, पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची खणखणीत फटकेबाजी; भारतासमोर तगडे लक्ष्य

SCROLL FOR NEXT