सातारा

कडक सुरक्षा! जिल्ह्यातील 27 पोलिस ठाण्यांत ऍन्टी ह्यूमन ट्रॅफीकिंग पथकांची होणार स्थापना

सचिन शिंदे

कऱ्हाड (ता. सातारा) : देह विक्रीच्यादृष्टीने महिलांसह अन्य अनेक कारणांसाठी लहान बालकांची अपहरणाव्दारे होणारी तस्करी आता रोखली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने कडक पावले उचलली आहेत. महिला, बालकांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध घालण्यासाठी ऍन्टी ह्यूमन ट्रॅफीकिंग सेलची स्थापना प्रत्येक पोलिस ठाण्यात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात रेल्वे पोलिस ठाण्यांचाही समावेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवरील पोलिसांसह नेहमीच्या 27 पोलिस ठाण्यांत पथकांची स्थापना होणार आहे. पुरुष, महिला अशा दोन अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांचा त्या पथकात समावेश असणार आहे. युवती, महिलांच्या छेडछाडीसाठी निर्भया पथक कार्यरत आहेत. त्यानंतर ऍन्टी ह्यूमन ट्रॅफींकिंग पथकाव्दारे पुन्हा नवे पाऊल टाकले आहे. 

राज्यासह जिल्ह्यात महिला, बालकांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण गंभीर आहे. ती स्थिती लक्षात घेऊन त्यावर ठोस पावले उचलण्यासाठी शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये महिला, बालकांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध घालण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी ऍन्टी ह्यूमन ट्रॅफीकिंग पथकाची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात असे पथक स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 27 पोलिस ठाण्यांत अशा पथकांची स्थापना होणार आहे. नवीन मल्हारपेठ पोलिस ठाण्याचाही त्यात समावेश आहे. ऍन्टी ह्यूमन ट्रॅफीकिंग पथक 24 तास कार्यरत राहणार आहे. त्याशिवाय ते पथक फिरतेही असणार आहे. पोलिस ठाण्यांतील उपलब्ध मनुष्यबळ त्यासाठी देण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. त्या पथकात सहा जणांचा समावेश असेल. एक महिला, एक पुरुष फौजदार व चार कर्मचारी देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील रेल्वे पोलिसांनाही ऍन्टी ह्यूमन ट्रफीकिंग पथकांची स्थापना करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे रेल्वे पोलिसांसह 300 कर्मचारी या पथकांसाठी नियुक्त केले जाणार आहेत. 

राज्यात 36 ठिकाणी सेल 

महिला व बालकांच्या अनैतिक मानवी वाहतुकीसंदर्भात गंभीर गुन्हे घडले आहेत. त्यावर निर्बंधासाठी शासनाने राज्यातील नऊ पोलिस आयुक्तालये व 27 जिल्ह्यांमध्ये 36 ठिकाणी ऍन्टी ह्यूमन ट्रॅफिकींग सेल तयार केले आहेत. त्यात सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. या गंभीर गुन्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी रेल्वे स्थानक आहे, तेथील पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. त्यामुळे स्थानिक व रेल्वे पोलिस यांना एकत्रित काम करावे लागणार आहे. या पथकाला मराठीमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष असेही संबोधण्यात आले आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

मच्छिंद्र कांबळी यांचं अजरामर 'वस्त्रहरण' नाटक पुन्हा भेटीला येणार; 'हा' कसलेला अभिनेता साकारणार तात्या सरपंच

Latest Marathi News Live Update : चाकण परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या बेकायदेशीर विक्रीचा भंडाफोड; २५१ सिलेंडर जप्त

SCROLL FOR NEXT