Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

कऱ्हाड : नदीपात्रात गटारातील दूषित पाणी; प्रांताधिकारी दिघेंचे कारवाईचे आदेश

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरातील वाढीव हद्दीतील माने वस्ती येथील गटरातील पाणी नदी पात्रात मिसळत आहे. ते पाणी त्वरित थांबवावे व संबंधितांवार पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई करून अहवाल सादर करावा, अशी नोटीस प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना दिली आहे. कार्वे भागात अतिसाराचे रूग्ण आढलले आहेत. ती अतिसाराची लागण वाढीव हद्दीत गोळेश्वर लगतच्या माने वस्तीपासून गटराचे पाणी नदी पात्रात मिसळल्याने झाल्याची तक्रार झाली आहे. त्यानुसार प्रातांधिकारी दिघे यांनी नोटीस काढून कारवाईचे आदेश दिले आहेत. 

स्वच्छ सर्वेक्षणात कऱ्हाड पालिकेने देशात एक लाख लोकसंख्येच्या पालिकांत सलग दोन वर्षे पहिला क्रमांक पटकावला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी दिघे यांनी पालिकेस काढलेली नाटीस अधिक गंभीर आहे. गुरुवारपासून कार्वे परिसरात अतिसाराचे रूग्ण आढळे आहेत. त्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, ती साथ वाढत आहे. त्याला कऱ्हाड शहरातील गटारीचे पाणी कारणीभूत आहे. त्याबाबत प्रांताधिकारी दिघे यांच्याकडे तशा तक्रारी गेल्या. त्यानुसार शुक्रवारी प्रातांधिकारी दिघे यांनी प्रत्यक्षात माने वस्ती येथे जावून पहाणी केली. त्यावेळी वस्तुस्थिती समोर आली. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी पालिकेस नोटीस काढली असून त्या संबंधितांवर आरोग्य विभागातर्फे कारावाई करून त्याचा अहवाल द्यावा, असे नोटिसीत म्हटले आहे. 

प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे की, पालिकेच्या गोळेश्वर नजीकच्या माने वस्तीत गटाराचे दूषित पाणी नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे कार्वे येथील नळ पाणी पुरवटा योजनेस दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे कार्वे गावात अतिसाराचे काही रूग्ण आढळले आहेत. त्या अतिसाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी कऱ्हाड पालिकेने आरोग्य विभागातर्फे दूषिच पाणी मिसळत आहे, त्या भागाची पहाणी करून तेथे तत्काळ कारवाई करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Restrictions: पुण्यात ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई; १४ दिवस कलम ३७ लागू, कधीपासून आणि का? जाणून घ्या...

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली १५ वर्षांची भारतीय नेमबाज अखेर सापडली! पोलीस तपासात कोणतं कारण समोर आलं?

Success Story: 1.5 लाखांची मुंबईतील नोकरी सोडून गावाकडे आला; आता महिन्याला कमावतोय 4 लाख रुपये! काय आहे गुंतवणुकीचा मंत्र?

Latest Marathi News Live Update : रामभक्तांवर रामरक्षा करण्याची वेळ भाजपानं आणली - उद्धव ठाकरे

Tukaram Mundhe : 'एआय'च्या मदतीने अन्नभेसळखोरांवर नजर! नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा इतिहास मिळणार एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT